अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (प्रकार व उपचार !) Seizure meaning in Marathi

अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) आहे मेंदू मध्ये अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी चा झटका येणे, ज्याच्या मुले विचित्र लक्षण दिसून येतात.

आपल्या सर्वांना हे माहिती आहे कि अपस्मारच्या झटक्यात शरीर जोर-जोरात हळू शकता. पण तुम्हाला हे माहिती आहे का, कि अपस्मारच्या अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी मुळे अगदी कोणता हि लक्षण होऊ शकते??

अश्या बऱ्याच लक्षणांना डॉक्टरांनी नावे दिली आहेत. अशी १०० पेक्षा अधिक नावे आहेत!

मग हे सगळे सोपा करून कसे समझहयचे? अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) कसा समझावा?

ह्या साठी, पहिली हि गोष्ट समझ कि अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार असतात:

अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार
१ . फोकल अपस्मार – छोटा अप्स्माराचा दौरा जो मेंदूच्या एकाच भागात होतो
२ . जनरलाइज़्ड अपस्मार- मोठा अप्स्माराचा दौरा जो पूर्ण मेंदू मध्ये इलेक्ट्रिसिटी अनियंत्रित झाल्या मुळे होतो.

सहसा झटके येण्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. याचे कारण म्हणजे बहुतांश लोकांना अशा प्रकारच्या झटक्यांबद्दल माहिती नसते.

मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, म्हणून झटक्याचा (सीझर) अर्थ अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) मराठीत सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.

झटक्याचा अर्थ पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे:

  1. झटके (सीझर) का येतात?
  2. झटक्यांची लक्षणे कोणती आहेत?
  3. झटक्यांचे निदान कसे केले जाते?
  4. झटक्यांवर कोणते उपचार केले जातात?

जर वारंवार झटके येत असतील, आणि तुमच्या मेंदूला झटके येण्याची सवय झाली असेल, तर या आजाराला मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सी असे म्हटले जाते.

झटक्यांबद्दल (सीझर) वाचून झाल्यानंतर, परत येऊन येथे क्लिक करा: (Meaning of Epilepsy in Marathi – (मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सी या आजाराचा अर्थ)

आता आपण झटक्याचा (सीझर) अर्थ (Seizure meaning in Marathi) समजून घेऊ या!

मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो. मी भारतातील एपिलेप्सी स्पेशालिस्ट (Epilepsy specialist in India) आहे आणि मी भारतात एपिलेप्सी सर्जरी (Epilepsy surgery in India) प्रदान करतो.

चला, सुरुवात करू या:

. चला, या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल वाचूया.

आपल्या मेंदूचे नियंत्रित कार्य

आपल्या मेंदूचे कार्य विद्युत प्रवाहावर आणि रासायनिक द्रव्यांवर चालते.

2oPDbnZXH0
मेंदूचे वेग-वेगळे भाग वेग-वेगळी कार्य करतात. हे भाग एक-मेकांशी इलेक्ट्रिसिटी द्वारे संकेत पाठवतात.

जेव्हा आपल्या मेंदूचा एक भाग दुसऱ्या एखाद्या भागाला संदेश पाठवू इच्छितो, तेव्हा मेंदू त्या भागात एका छोटासा विद्युत प्रवाह पाठवतो.

अशा प्रकारचे करोडो छोटे-छोटे प्रवाह आपल्या मेंदूत सतत प्रवाहित होत असतात.

हे सगळे विद्युत प्रवात नियंत्रित असतात.

जेव्हा तुमची इच्छा असते, तेव्हाच तुमचा मेंदू हात हलवण्याचा संदेश पाठवतो. जेव्हा तुमची इच्छा असते, तेव्हाच तुमचा मेंदू तोंडातून आवाज काढण्याचा संदेश पाठवतो.

छोटे झटके का येतात (Focal Seizure meaning in Marathi)?

आता जरा विचार करा की मेंदूतील दोन लहान-लहान वायर्स एकमेकांना चिकटून बसतात. याला इंग्रजीमध्ये क्रॉस-कनेक्शन म्हणतात.

अशा वेळी काय होईल?

हो, तेथील विद्युत प्रवाह अनियंत्रित होईल. विद्युत प्रवाह विनाकारण फडफडत राहील.

Focal Seizure meaning in Marathi
जेव्हा अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी फक्त एका भागात असते तेव्हा त्याला “छोटी फिट” किंवा “Focal seizure” म्हणतात.

जेव्हा हा अनियंत्रित विद्युत प्रवाह मेंदूतील एकाच भागापर्यंत मर्यादित असतो, तेव्हा सौम्य लक्षणे जाणवतात, जसे की:

  • मेंदूतील ज्या भागामुळे आपल्या हाताची हालचाल होते, त्या भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर आपला हात आपोआप फडफडायला लागतो.
  • जर मेंदूच्या सुगंधाशी संबंधित भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर आपल्याला विनाकारण खूप छान सुगंध येऊ लागतो किंवा खूप दुर्गंध जाणवू लागते.

इंग्रजीमध्ये याला “Focal Seizure” म्हणतात. मराठीत तुम्ही याला “छोटा झटका” म्हणू शकता.

मोठे झटके का येतात (Generalized Seizure meaning in Marathi)?

एखाद्या ढगाप्रमाणे, कधीकधी हा अनियंत्रित विद्युत प्रवाह १०-१५ सेकंदांमध्ये संपूर्ण मेंदूत पसरतो.

असे प्रत्येक वेळी घडत नाही. पण, जेव्हा असे घडते तेव्हा संपूर्ण शरीर जोरजोरात थरथरू लागते.

Generalized Seizure meaning in Marathi
Generalized Seizure meaning in Marathi

माणसाची शुद्ध हरपते, काही वेळा तो जीभ चावून घेतो. त्याचे डोळे उघडे राहतात. बहुतेक वेळा मोठ्या झटक्याच्या वेळी मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण नसते.

मोठा झटका सहसा फक्त १-२ मिनिट इतक्या कालावधीचा असतो.

अशा प्रकारच्या मोठ्या झटक्यानंतर, माणसाला थकवा जाणवतो. त्याला पूर्णपणे बरे व्हायला २० पेक्षा जास्त मिनिटे लागू शकतात.

इंग्रजीमध्ये याला “Generalized Seizure” म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही याला “मोठा झटका” म्हणू शकता.

झटक्यांच्या वेळी विद्युत प्रवाह अनियंत्रित का होतो?

आता आपण थोडेसे खोलात जाऊ या.

Seizure meaning in Marathi तुम्हाला याचा अर्थ लगेच कळावा म्हणून मी म्हटले होते की क्रॉस-कनेक्शनमुळे विद्युत प्रवाह अनियंत्रित होतो.

या क्रॉस-कनेक्शनचे नेमके कारण समजणे थोडेसे कठीण आहे. म्हणून त्याविषयी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्हाला झटके येण्याच्या कारणांबद्दल आणखी जास्त जाणून घ्यायचे असेल, तर येथे क्लिक करा [डॉ. बालेस्ट्रिनी यांनी लिहिलेला लेख, इंग्रजीमध्ये].

कारण १. पेशींच्या नलिकांमध्ये बिघाड: मेंदूच्या पेशींमध्ये परमाणू आत-बाहेर जाण्यासाठी सूक्ष्म नलिका असतात. जर यांच्यापैकी एखाद्या नलिकेमध्ये बिघाड झाला, तर झटके येण्याचा आजार होऊ शकतो.

कारण २. गर्भातील बाळाचा अनियमित विकास: गर्भात असतानाच आपल्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला असतो. गर्भात असताना मेंदूच्या विकासात काही अडथळा निर्माण झाल्यास, झटके येण्याचा आजार उद्भवू शकतो.

pregnant 6178270 1920
गर्भात अनियंत्रित विकास झाल्या मुले मिरगी (एपिलेप्सी) चा त्रास होऊ शकतो.

कारण ३. रक्तातील दूषित रासायनिक पदार्थ: कधीकधी यकृताच्या (लिव्हर) किंवा मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारामुळे रक्तात दूषित रासायनिक पदार्थ जमा होतात. यांच्यामुळे झटके येण्याचा आजार होऊ शकतो.

कारण ४. जन्मानंतर मेंदूला इजा: अपघातामुळे, मेंदूतील गाठीमुळे, लकव्यामुळे मेंदूला जबर इजा पोहचते, त्यामुळे झटके येऊ शकतात.

HeadTrauma
डोक्यावर जोराचा मार लागल्याने मार्गी (एपिलेप्सी) चा आजार सुरु होऊ शकतो.

झटके येण्याची इतर लक्षणे

झटक्यांची अनेक लक्षणे असू शकतात.

पण, मेंदूच्या काही मोजक्या भागांमध्ये वारंवार झटके येतात. म्हणून या भागांमध्ये होणारी लक्षणे आपल्याला बहुतेक वेळा पाहायला मिळतात.

बहुतेक वेळा पाहायला मिळणाऱ्या झटक्यांची लक्षणे
1. दुर्गंध किंवा खूप जास्त सुगंध जाणवणे

2. वाईट चव – काही लोकांना तोंडात रक्ताची किंवा धातूची चव जाणवते

3. अचानक अतिशय घाबरणे किंवा व्याकूळ होणे

4. स्मृतीशी संबंधित विकार – रुग्णाला वाटते की असे तर माझ्यासोबत घडले आहे!

5. अचानक दृश्य-भास (वाईट स्वप्न) होणे

6. शरीराच्या अवयवांमध्ये/हात किंवा पायांमध्ये मुंग्या येणे

7. शरीराचे अवयव/हात किंवा पाय थरथरणे

8. स्वतःमध्ये मग्न असणे, प्रतिसाद न देणे

 

पण, मी म्हटल्याप्रमाणे, झटके येण्याची कोणतीही लक्षणे असू शकतात. आता ही आहेत झटके येण्याची असामान्य लक्षणे:

झटके येण्याची असामान्य लक्षणे
1. विनाकारण अचानक राग व्यक्त करणे

2. विनाकारण अचानक अत्यंत आनंदी होणे किंवा अत्यंत दुःखी होणे

3. शरीराच्या बाहेर तरंगत असल्याचा भास होणे

4. अचानक मळमळ/उलटीचा भास होणे

5. अचानक मूत्र विसर्जन करण्याची इच्छा होणे

6. चक्कर येणे

7. विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा भास होणे

8. जलद गतीने डोळे फडफडणे

laughing boy
विनाकारण हसणे किंवा विनाकारण रडणे पण फिट (सीझर) चे लक्षण असू शकते.

मिरगीच्या झटक्यांना इंग्रजीमध्ये इतकी सारी नावे का आहेत?

आता तुम्हाला Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) माहीत झालेला आहे. सोप्या शब्दांमध्ये लक्षणांचे वर्णन केल्यामुळे अर्थ एकदम स्पष्ट होतो.

पण, डॉक्टर लोक इतक्या सरळ-सोप्या नावांनी कधीच समाधानी होत नसतात!!!

यातील विनोदाचा भाग सोडला, तर सहसा इंग्रजीच्या कठीण शब्दांची गरज भासत नाही. पण, झटक्यांची लक्षणे समजावून सांगायला या शब्दांमुळे मला खूप मदत होते.

नावांपेक्षा झटक्यांच्या लक्षणांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणामध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास, ती लक्षणे ओळखणे तुम्हाला शक्य होईल.

KpJFhquZdy
खालील दिलेल्या नावानं पेक्षा त्यांची लक्षणं काय आहेत ते समझून घ्या.

झटक्यांच्या (सीझर) वेळी जी लक्षणे दिसतात, त्यांच्या आधावरावर छोट्या झटक्यांना अनेक वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत:

(Focal Seizures) छोट्या झटक्यांची लक्षणे आणि नावे

आपण पाहिल्याप्रमाणे, छोटे झटके मेंदूच्या एकाच भागात होतात. यांच्यामुळे होणारी लक्षणे छोटी असतात.

Focal Seizure meaning in Marathi माहिती करून घेण्यासाठी या छोट्या लक्षणांबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे.

या छोट्या झटक्यांची इंग्रजी नावे आहेत ऑटोमॅटिझम, डेजा-वू, इत्यादी. यांच्याबद्दल तपशीलवारपणे वाचण्यासाठी खाली दिलेल्या क्रॉस चिन्हावर क्लिक करा.

छोट्या झटक्यांची लक्षणे आणि त्यांची इंग्रजी नावे

छोट्या झटक्यांची नावेछोट्या झटक्याची लक्षणे
ऑटोमॅटिझमरुग्ण नकळतपणे पुन्हा-पुन्हा त्याच त्या हालचाली करू लागतो – जसे की हात चोळणे,  जीभ आत-बाहेर करणे, मिटक्या मारणे (lip smacking seizure), इत्यादी.
डिसोसीएटिव्ह सीझररुग्ण स्वतःमध्येच मग्न असतो. प्रतिसाद देत नाही.
डेजा-वू सीझररुग्णाला विचित्र भास होतात. त्याला वाटते की, “अरे! असे तर माझ्यासोबत याआधी देखील घडले आहे.”
जामे-वू सीझररुग्णाला विचित्र भास होतो. त्याला आधीही झटके येऊन गेलेले असतात, तरीपण त्याला वाटते की, “अरे! हे तर, काहीतरी नवीनच आहे.”
हायपर-कायनेटिक सीझररुग्ण अतिशय उत्तेजित होतो!!! तो एखाद्या माशाप्रमाणे तडफडू लागतो, किंवा जेलमधील कैद्याप्रमाणे मोठ्याने किंचाळतो, अतिशय जोरजोरात हात-पाय आपटतो!
डॅक्रिस्टिक सीझररुग्ण विनाकारण रडू लागतो.
गेलास्टिक सीझररुग्ण विनाकारण हसू लागतो.

अशा प्रकारच्या असामान्य झटक्यांची लक्षणे पाहून चेष्टा करणे किती सोपे आहे! बिचाऱ्या रुग्णाची विनाकारण चेष्टा करणे खरोखर किती सोपे आहे!

असे करू नका. झटक्यांची लक्षणे ओळखा. त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करा.

(Generalized Seizures) मोठ्या झटक्यांची लक्षणे आणि नावे

आपण माहिती करून घेतल्याप्रमाणे, मेंदूत सगळीकडे विद्युत प्रवाहाचे वादळ पसरल्यामुळे मोठे झटके उद्भवतात.

अपेक्षेप्रमाणे, मोठ्या झटक्यांची लक्षणेदेखील मोठी असतात.

Generalized convulsion
मोठ्या झटक्या च्या वेळेला होणारी लक्षणं पण मोठी असतात. पूर्ण शरीर जोर-जोरात हल्ले तर त्याला इंग्रेजी मध्ये “Generalized Convulsion” म्हणतात.

परत एकदा, नावांपेक्षा लक्षणांकडे पाहा. ही लक्षणे समजणे Generalized Seizure meaning in Marathi समजण्यासाठी आवश्यक आहे.

या मोठ्या झटक्यांची इंग्रजी नावे आहेत अब्सेंट सीझर, मॅलोनिक सीझर, इत्यादी. यांच्याबद्दल तपशीलवारपणे वाचण्यासाठी क्रॉस चिन्हावर क्लिक करा:

मोठ्या झटक्याची लक्षणे आणि इंग्रजी नावे.

मोठ्या झटक्यांची नावेमोठ्या झटक्याची लक्षणे
अब्सेंट (पेटिट-माल) सीझररुग्ण/मूल प्रतिसाद देत नाही. त्याचे डोळे उघडे राहतात, पण तो स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असल्यासारखा वाटतो.
मायो-क्लोनिक सीझरजणू काही विजेचा झटका लागल्याप्रमाणे, अचानकपणे एकदाच संपूर्ण शरीर थरथरते.
स्पाझमसंपूर्ण शरीर काही सेकंदांसाठी ताठर होते.

हे पहा अब्सेंट (पेटिट-माल) सीझर चे एक उद्धरण (डॉ राजीव गुप्ता – Youtube द्वारे):

आणि हे लहान मुलाला पुन्हा-पुन्हा स्पाझम चा झटका येतोय:

छोट्या आणि मोठ्या दोन्ही झटक्यांच्या वेळी दिसणारी लक्षणे:

काही लक्षणे दोन्ही प्रकारच्या झटक्यांच्या वेळी दिसू शकतात – जसे की हात-पाय ताठर होणे किंवा जोरजोरात थरथर कापणे.

जेव्हा अनियंत्रित विद्युत प्रवाह एकाच भागापुरता मर्यादित असतो (छोटा झटका), तेव्हा शरीराचा फक्त एकच भाग थरथर कापतो.

जेव्हा हा अनियंत्रित विद्युत प्रवाह संपूर्ण मेंदूत पसरतो (मोठा झटका) तेव्हा हीच लक्षणे संपूर्ण शरीरात पाहायला मिळतात.

अशा प्रकारच्या झटक्यांची नावे आहेत टोनिक सीझर, क्लोनिक सीझर, इत्यादी. यांच्याबद्दलच्या तपशीलवार माहितीसाठी क्रॉस चिन्हावर क्लिक करा:

छोट्या आणि मोठ्या झटक्यांची लक्षणे आणि त्यांची इंग्रजी नावे

छोट्या आणि मोठ्या झटक्यांची नावेलक्षणे
टॉनिक सीझरशरीराचा एक भाग किंवा संपूर्ण शरीर कडक होते.

 

हे काहीसे स्पाझमप्रमाणेच असते.

क्लोनिक सीझरशरीराचा एक भाग किंवा संपूर्ण शरीर जोरजोरात थरथरू लागते.
टॉनिक-क्लोनिक सीझरशरीर थोड्या वेळासाठी कडक होते, मग १०-१५ सेंकंदानंतर जोराजोरात थरथरू लागते.
ए-टॉनिक सीझरअचानकपणे शरीराच्या एका भागाची किंवा संपूर्ण शरीराची ताकत नाहीशी होते.
ड्रॉप-अटॅकरुग्ण/मूल अचानकपणे खाली कोसळतो.

हे पहा ए-टॉनिक सीझर चे एक उद्धरण, Youtube वर एका आईने पोस्ट केले आहे:

आता तर तुम्ही Seizure meaning in Marathi मध्ये अगदी तरबेज झाला आहात!

आता, झटक्यांच्या तपासणीबद्दल पाहू या.

सारांश

१. Seizure meaning in Marathi म्हणजे झटके (सीझर).

२. आपल्या मेंदूतील वेगवेगळे भाग नियंत्रित विद्युत प्रवाहाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात.

 

३. अनियंत्रित विद्युत प्रवाहामुळे झटके उद्भवतात.

४. जेव्हा मेंदूतील छोट्याशा भागात विद्युत प्रवाह अनियंत्रित असतो, तेव्हा त्याला छोटा झटका (फोकल सीझर – Focal Seizure) म्हटले जाते.

५. जेव्हा अनियंत्रित विद्युत प्रवाह संपूर्ण मेंदूत पसरतो, तेव्हा त्याला मोठा झटका (जनरलाईज्ड सीझर – Generalized Seizure) म्हटले जाते.

६. छोट्या आणि मोठ्या झटक्यांच्या लक्षणांबद्दल वर तपशीलवारपणे सांगितलेले आहे.

 

जसे की तुम्ही नंतर, Epilepsy meaning in Marathi (मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सीचा अर्थ) या लेखात वाचन करू शकाल:

१. एम-आर-आय द्वारे मेंदूची फोटो काढली जातात. “३ टेस्ला” एम-आर-आय अतिशय चांगला असतो.

२. ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.

३. झटके/मिरगीच्या (अपस्मार) उपचारासाठी कितीतरी औषधे उपलब्ध आहेत.

४. जर २-३ औषधांचा वापर करूनही फायदा होत नसेल, तर झटक्यांवरील शस्त्रक्रिया किंवा वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर (VNS) यांच्याबद्दल विचार केला पाहिजे.

५. झटक्यांवरील शस्त्रक्रिया किंवा VNS बद्दल जगात कोणीही १००% हमी देऊ शकत नाही. पण, लक्षपूर्वक, मन लावून हे उपचार केल्यास, कितीतरी रुग्णांना बऱ्यापैकी फायदा होतो.

 

 

सावधगिरीचा इशारा: ही माहिती फक्त शिक्षणासाठी देण्यात आलेली आहे. रोगनिदान आणि औषधोपचारासाठी योग्य डॉक्टरांची स्वतः भेट घ्या. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या औषधांचा डोस वाढवू नका किंवा औषधे पूर्णपणे बंद करू नका!!द करे!!

डॉ सिद्धार्थ खारकर

डॉ. सिद्धार्थ खारकर हे “आउटलुक इंडिया” आणि “इंडिया टुडे” यांसारख्या नियतकालिकांच्या मते मुंबईतील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट्सपैकी एक आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे न्यूरोलॉजिस्ट, मिरगी (अपस्मार) आणि पार्किंसन्स रोगाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी भारत, अमेरिका, आणि इंग्लंडमधील सर्वोत्तम वैद्यकीय संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

परदेशात कितीतरी वर्षे कार्य केल्यानंतर, ते भारतात परतले, आणि आता ते महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थायिक झालेले आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे आंतरराष्ट्रीय पार्किन्सन्स आणि मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या एका संशोधन गटाचे आंतरराष्ट्रीय संचालक आहेत.

फोन 022-4897-1800

ईमेल पाठवा

4 thoughts on “अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (प्रकार व उपचार !) Seizure meaning in Marathi”

  1. Maja mulga 3 years cha ahe tyala divsatun 7/8 vela najar tight ani thar thar kapto 10 to 14 sec

    Reply
    • It seems possible that your child is having a seizure. Appropriate treatment of seizure is essential. Please see a good Neurologist close to you.

      Reply
  2. My doughter age 19 years old, suddenly a drop seizur at 04.05 hours today at Manmad railway station.

    Reply
    • Please take her to the closest neurologist. She will need a full workup.

      Reply

Leave a Comment

Noted as one of the best Neurologists in Mumbai

India Today Magazine - 2020, 2021, 2022, 2023

Outlook India Magazine - 2021, 2023

Ex-Assistant Professor, University of Alabama, USA

Outlook India - Best neurologist in Mumbai