एपिलेप्सीचा अर्थ (प्रकार व 2 उपचार!) Epilepsy meaning in Marathi

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सीचा अर्थ) अर्थ आहे, वारंवार झटके येण्याचा आजार.

कृपया हा लेख वाचण्याच्या आधी, हा लेख जरूर वाचा: Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) .

झटके येण्याचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच, तुम्हाला अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी या शब्दांचा अर्थ माहीत होईल.

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) जाणून घेण्यासोबतच, या लेखात आपण अप्सरमारची तपासणी, आणि अप्सरमारवरील उपचाराबद्दल चर्चा करणार आहोत.

अप्सरमारचा दौऱ्याचे २ मुख्य प्रकार आहेत:

अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार
१ . फोकल अपस्मार – छोटा अप्स्माराचा दौरा जो मेंदूच्या एकाच भागात होतो
२ . जनरलाइज़्ड अपस्मार- मोठा अप्स्माराचा दौरा जो पूर्ण मेंदू मध्ये इलेक्ट्रिसिटी अनियंत्रित झाल्या मुळे होतो.

अप्सरमारचा दौऱ्यावर २ मुख्य चाचण्या करतात:

अप्सरमारचा दौऱ्यावर २ चाचण्या
१ . MRI – मेंदू चा एक चित्रं किंवा फोटो
२ . EEG – मेंदू मधल्या इलेक्ट्रिसिटी ची चाचणी

अप्सरमारचा दौऱ्यावर २ उपचार आहेत:

मिर्गी के २ इलाज
१ . औषधं: २० पेक्षा जास्त औषधं उपलब्ध आहेत.
२ . सर्जरी: रेसेक्टिव सर्जरी, VNS, DBS अश्या बऱ्याच प्रकारच्या सुरजरी उपलब्ध आहेत.

मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो.

मी भारतातील पार्किन्सन्स आणि (Epilepsy specialist in Mumbai) एपिलेप्सी तज्ञ आहे आणि मी भारतात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी शस्त्रक्रिया (Epilepsy surgery in India) प्रदान करतो.

झटका (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार) यांच्यात फरक:

झटका येणे ही एक घटना आहे. झटका एक किंवा दोन मिनिटांपर्यंत असू शकतो, आणि मग थांबतो. रुग्ण १०-२० मिनिटांमध्ये बरा होतो.

पण, असे जर वारंवार होत असेल, तर मग हे कोणत्या गोष्टीचे सूचक आहे?

असे होणे या गोष्टीचे सूचक आहे की, तुमच्या मेंदूला झटके येण्याची प्रवृत्ती आहे.

S8WWHagsUa
Tendency म्हणजे प्रवृत्ती. जर मेंदूला पुन्हा-पुन्हा सीझर होण्याची प्रवृत्ती असेल, तर त्याला एपिलेप्सी म्हणतात.

या प्रवृत्तीला, या वारंवार झटके येण्याच्या सवयीला इंग्रजीमध्ये “एपिलेप्सी” असे म्हणतात. मराठीमध्ये याला “अप्सरमारचा (अपस्मार) आजार” म्हणतात.

फरक आता स्पष्ट आहे:

 • अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी हे आजाराचे नाव आहे.
 • वारंवार होणाऱ्या घटनेला झटका येणे (सीझर) म्हणतात.

आता तुम्हाला कळलेच असेल, की Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा (अपस्मार) अर्थ) आणि Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) असे वेगवेगळे दोन लेख का आहेत.

एखाद्या व्यक्तीला झटके येतात (सीझर) हे कसे ओळखायचे?

अचानकपणे होणारे काही आजार अप्सरमारच्या झटक्यांप्रमाणेच वाटू शकतात. जसे की, जर हृदयाच्या आजारामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसेल, तर तुम्ही अचानक बेशुद्ध पडू शकता! जर तुम्हाला पॅरासोम्निया नावाचा आजार असेल, तर रात्री झोपेत स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही ओरडून झोपेतून जागे होऊ शकता!

तुम्हाला आठवत असेल: झटका येणे हे मेंदूतील अनियंत्रित विद्युत प्रवाहामुळे घडते. इतर बाबतींत अनियंत्रित विद्युत प्रवाह कारणीभूत नसतो.

OBt3uDRX26
मेंदूत अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी चे वाढलं झाले तर त्याला सीझर चा झटका म्हणतात. असे जर पुन्हा-पुन्हा झाले तर त्याला एपिलेप्सी म्हणतात.

पण, जेव्हा रुग्ण इस्पितळात डॉक्टरला भेटतो, तेव्हा डॉक्टर रुग्णाला अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विचारतो. जर रुग्णाला पुढील प्रकारचे झटके येत असतील ज्यामध्ये:

 • पूर्व-संकेत होतो (जसे की, दुर्गंध, किंवा अतिशय घाबरणे, किंवा दृश्य-भास होणे, किंवा थरथरणे)
 • १-२ मिनिटे रुग्ण काहीच प्रतिसाद देत नाही
 • १-२ मिनिटे शरीर जोरजोरात थरथर कापते, पण डोळे उघडे राहतात
 • झटका येऊन गेल्यावर, रुग्णाला बरे होण्यासाठी १५-४५ मिनिटे लागतात

असे होत असल्यास, हे झटके अप्सरमारचे असण्याची शक्यता जास्त असते, आणि इतर एखाद्या आजारामुळे असे घडण्याची शक्यता कमी असते.

कधीकधी तर डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाहीत, की रुग्णाला येणारे झटके अप्सरमारचे आहेत, की इतर कोणत्या आजाराचे. अशा वेळी, लाँग-टर्म-व्हिडिओ-ईईजी काढले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीला अप्सरमार (अपस्मार) हा आजार आहे हे कसे ओळखायचे?

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत सांगतो.

असे समजू या की तुम्ही डॉक्टर आहात, आणि मी एक रुग्ण आहे.

समजा की मला वारंवार झटके येतात. तर तुम्ही म्हणाल की हे तर अगदी स्पष्ट आहे की माझ्या मेंदूला वारंवार झटके येण्याची प्रवृत्ती आहे. तुम्ही म्हणाल, की मला “अप्सरमार (अपस्मार)” हा आजार आहे. आणि तुम्ही मला पुन्हा झटके न येण्याची औषधे द्याल.

पण, समजा मला फक्त एकदाच, किंवा पहिल्यांदा झटका येतो. तर मग आता?

आता मी तुम्हाला म्हणणार, की डॉक्टर:

“आता मी काय पुढच्या झटक्याची वाट बघू? कोणतीतरी चाचणी असेलच तुमच्याजवळ, ज्यामुळे कळू शकेल की माझ्या मेंदूला पुन्हा झटका येण्याची प्रवृत्ती आहे की नाही???”

आणि माझे म्हणणे अगदी योग्यच आहे. अशा प्रकारचे टेस्ट/चाचण्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. यांमध्ये दोन मुख्य चाचण्या आहेत, एक आहे एम-आर-आय (MRI) आणि दुसरी आहे ई-ई-जी (EEG).

EEG for Epilepsy in hindi
ई-ई-जी ह्या टेस्टनी तुम्हाला पुन्हा-पुन्हा सीझर होण्याची प्रवृत्ती आहे कि नाही, म्हणजेच तुम्हाला एपिलेप्सी आहे कि नाही ते कळू शकते.

ज्यांना झटके येतात अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत या चाचण्या केल्या जातात.

 • जर तुम्हाला अप्सरमार (अपस्मार) हा आजार असेल, तर या चाचण्यांमुळे आजाराचे कारण शोधण्यास मदत होऊ शकते.
 • जर तुम्हाला अप्सरमारचा झटका एकदाच आला असेल, तर तुम्हाला पुन्हा झटका येण्याची शक्यता आहे की नाही हे या चाचण्यांमुळे कळू शकते.

पण, या चाचण्यांबद्दल चर्चा करण्याच्या आधी, Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) पूर्णपणे समजण्यासाठी अप्सरमारचे (अपस्मार) प्रकार समजून घेऊ या.

अप्सरमारचे प्रकार (Types of Epilepsy meaning in Marathi)

चला तर मग Types of Epilepsy meaning in Marathi – अप्सरमारचे प्रकार, मराठीमध्ये – जाणून घेऊ या.

अप्सरमारचे प्रकार समजण्यासाठी, तुम्हाला आधी Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) हा लेख वाचावा लागेल.

रुग्णाला ज्या प्रकारचे झटके (सीझर) येतात, त्या प्रकारच्या अप्सरमारचे नाव त्या आजाराला दिले जाते. उदाहरणार्थ:

झटक्याचे नावअप्सरमारचा प्रकार
एब्सेंट झटकाएब्सेंट एपिलेप्सी
मायो-क्लोनिक झटकामायो-क्लोनिक एपिलेप्सी

जर रुग्णामध्ये या आजाराची सुरुवात किशोरावस्थेत (१०-१८ वर्ष) झाली तर याला “ज्युवेनाईल मायो-क्लोनिक एपिलेप्सी” (JME) म्हटले जाते.

गेलास्टिक झटकागेलास्टिक एपिलेप्सी

हा पहा एब्सेंट झटका (एब्सेंट एपिलेप्सी मध्ये होणाऱ्या झटक्याचे) उद्धरण:

कधीकधी अप्सरमारचे नाव, मेंदूच्या ज्या भागातून झटके येतात त्यावर अवलंबून असते.

मेंदूचे चार मुख्य भाग आहेत –

 • डोळ्यांच्या वर “फ्रंटल लोब”
 • कानांच्या खाली “टेंपोरल लोब”
 • आणि मागच्या बाजूस “परायटल लोब” आणि “ऑक्सिपिटल लोब”
झटक्याचे नावअप्सरमारचा प्रकार
डेजा-वू झटका

जामे-वू झटका

अशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब” मधून होणारी एपिलेप्सी, म्हणजे असे “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होते.
हायपर-कायनेटिक झटकाअशा प्रकारचे झटके सहसा “फ्रंटल लोब” एपिलेप्सीमध्ये होतात. कधीकधी असे “टेंपोरल लोब एपिलेप्सी” किंवा “परायटल लोब एपिलेप्सी” मध्येही होऊ शकते.
गेलास्टिक झटकाअशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात.
beautiful 2315 1920
झटका (सीजर) मुळे खूप जुन्या आठवणी पुन्हा येऊ शकतात. डेजा-वू झटक्या मधे “हे माझ्या बरोबर आधी पण झालाय” असा भास होतो.

इत्यादी…

आणि शेवटी, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येऊ शकतात. काही लोकांमध्ये अप्सरमारचे नाव इतर गोष्टींवर – जसे की, मेंदूची विचार करण्याची क्षमता, आनुवंशिकता, इत्यादींवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ:

अप्सरमारचे प्रकारअर्थ
स्टुर्ग – वेबर सिंड्रोमयामध्ये लहान मुलांना झटका येण्यासोबतच चेहऱ्यावर तांबडे डागही पाहायला मिळतात.
लेंनॉक्स-गस्टाउट सिंड्रोमलहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येतात (टोनिक, अ-टॉनिक, मायो-क्लोनिक, ड्रॉप-अटॅक, इत्यादी) आणि यांना नियंत्रणात ठेवणे कठीण असते.
लँडो-क्लेफनर सिंड्रोमयामध्ये लहान मुलांमध्ये झटक्यासोबतच बोलण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. वेळीच अप्सरमारवर उपचार न केल्यास, मुले मूक होऊ शकतात!
Landau Kleffner speech
लँडो-क्लेफनर सिंड्रोम मुळे मुलाची बोलण्याची शक्ती हळू-हळू कमी होऊन, पूर्ण पणे जाऊ शकते. म्हणून योग्य वेळेला उपचार करणे गरजेचे असते.

अप्सरमारचे अशा प्रकारे कितीतरी नावे आहेत, आणि दर ५ वर्षांनी अशी कितीतरी नवीन नावे पुढे येतात. जर तुम्हाला या नावांबद्दल तपशीलवार अभ्यास करायचा असेल, तर येथे क्लिक करा: [वेगळ्या वेबसाईटवर तपशीलवार लिहिलेला लेख, इंग्रजीमध्ये]

अप्सरमारची तपासणी (Investigation of Epilepsy meaning in Marathi)

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) चा खरा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी याच्या तपासणीबद्दलही आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीला जर झटका आला असेल, तर कमीतकमी दोन चाचण्या करणे गरजेचे आहे:

१) एम-आर-आय (MRI – Magnetic Resonance Imaging)

एम-आर-आय एक मशीन आहे, ज्याद्वारे मेंदूचे सूक्ष्म फोटो काढले जातात.

ही पाहा एम-आर-आय मशीन:

MRI e1624178836736

एम-आर-आय द्वारे मेंदूतील सूक्ष्म गोष्टी दिसतात. एम-आर-आय द्वारे मेंदूच्या रचनेतील विकृती, लहानपणी मेंदूला झालेली इजा, मेंदूतील गाठ, इत्यादी सर्व गोष्टी दिसतात.

अशा गोष्टींची उदाहरणे पाहा.

तीन गोष्टी समजण्यासारखी आहेत:

१. एम-आर-आय सर्वत्र उपलब्ध नसते. म्हणून काही डॉक्टर मेंदूची चित्रे काढण्यासाठी सी-टी सकॅनचा उपयोग करतात. पण सी-टी स्कॅनची चित्रे एम-आर-आय प्रमाणे सूक्ष्म नसतात. म्हणून, माझ्या मते अप्सरमारचा/झटके येण्याचा आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एम-आर-आय काढला पाहिजे.

२. “३ टेस्ला” नावाचा एम-आर-आय साधारण एम-आर-आयच्या तुलनेत चांगली चित्रे काढतो.

३. एम-आर-आय देखील अतिशय सूक्ष्म गोष्टी पाहू शकत नाही. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराने ग्रस्त ५०% रुग्णांमध्ये एम-आर-आय अगदी नॉर्मल असल्याचे दिसते. एम-आर-आय नॉर्मल असणे ही खरोखर एक चांगली बातमी आहे. याचा अर्थ असा की तुमची समस्या इतकी छोटी आहे की ती एम-आर-आयवर देखील दिसून येत नाही!

ई-ई-जी (EEG)

ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.

ई-ई-जी च्या मशीन ने मेंदू मधल्या इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करता येतो.

जर एखाद्या भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर तो ई-ई-जी मध्ये दिसून येतो.

एका रुग्णाची ई-ई-जी काढली जात असल्याचे तुम्ही पाहू शकता.

यामध्ये देखील तीन गोष्टी समजून घेण्यासारखी आहेत:

१. ई-ई-जी द्वारे फक्त विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते. या मशीनमध्ये विद्युत निर्मिती होत नाही किंवा यामुळे मेंदूला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची भीती राहत नाही.

२. ई-ई-जी मेंदूतील अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाहाचे मोजमाप करू शकत नाही. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराने ग्रस्त ५०% रुग्णांमध्ये ई-ई-जी देखील अगदी नॉर्मल असल्याचे दिसते.

३. दीर्घ ई-ई-जी (उदाहरणार्थ ४ तासांचा ई-ई-जी) केल्यास अनियंत्रित विद्युत प्रवाहाचे मोजमाप करण्याची क्षमता वाढते.

४. ज्या दिवशी ई-ई-जी करायची आहे त्याच्या आधीच्या रात्री कमी झोपल्यास, अनियंत्रित विद्युत प्रवाहाचे मोजमाप करण्याची क्षमता वाढते. पण, ई-ई-जी करण्याच्या आधीच्या रात्री कमी झोपायला तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितले असेल, तरच असे करा.

5At7hOYeTy
ई-ई-जी करायच्या आधी बरेच डॉक्टर तुम्हाला कमी झोपायला सांगतील

इतर चाचण्या:

सामान्यत: झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजारामध्ये यापेक्षा जास्त चाचण्या करण्याची गरज नसते.

काही लहान मुलांना रक्तातील रासायनिक द्रव्ये कमी-जास्त झाल्याने झटके येण्याचा आजार होऊ शकतो. अशा वेळी रक्ताची तपासणी करण्याची आवश्यकता असू शकते.

जर तुमचे निदान स्पष्ट नसेल किंवा औषधोपचार करूनही झटके नियंत्रणात येत नसतील, तर डॉक्टर तुम्हाला लाँग-टर्म-व्हिडिओ-ई-ई-जी करायला सांगू शकतात.

लाँग-टर्म-व्हिडिओ-ई-ई-जीसाठी रुग्णाला इस्पितळात भरती केले जाते. २ ते ७ दिवसपर्यंत रुग्णाच्या मेंदूतील विद्युत प्रवाहाचा अगदी सखोल अभ्यास केला जातो. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराच्या निदानासाठी ही सर्वात चांगली तपासणी आहे. या तपासणीसाठी काही दिवस लागतात आणि पैसेही खर्च होतात, म्हणून सर्व रुग्णांच्या बाबतीत या तपासणीचा वापर केला जात नाही.

EEG monitoring e1624179264106

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) समजून घेण्याच्या बाबतीत तुम्ही आणखी एक पायरी पार केली आहे!

आता आपण उपचाराबद्दल जाणून घेऊ या.

अप्सरमारचा उपचार (Treatment of Epilepsy meaning in Marathi)

Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) आता तुम्हाला माहीत झालेला आहे, आणि याच्यासाठी कोणत्या चाचण्या/तपासण्या करायच्या असतात हेदेखील तुम्हाला समजले आहे.

आता आपण उपचाराकडे वळू या.

१) अप्सरमारसाठी औषधे:

सर्वसधारणत:, अप्सरमारच्या झटक्यांचा उपचार औषधांद्वारे केला जातो.

अप्सरमारसाठी औषधे उपलब्ध आहेत. अप्सरमारच्या औषधांची एक मोठी यादी इंग्रजीमध्ये येथे दिलेली आहे: [येथे क्लिक करा].

medications 1853400 1920
अप्सरमारसाठी बरीच औषधे उपलब्ध आहेत. उचित औषध निवडणे ही एक कला आहे.

 

यांच्यामध्ये, अप्सरमारची ही औषधे सर्वसामान्य आहेत:

औषधांची नावेटिप्पणी
Phenobarbital

फिनोबार्बिटाल – उदा. गार्डीनल, इत्यादी

जुनी औषधे. आजकाल यांचा उपयोग कमी केला जातो.
Phenytoin

फिनेटोइन – उदा. एपटोइन, इत्यादी

जुने औषध आणि याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण, हे खूप स्वस्त आहे आणि परिणामकारक आहे, त्यामुळे काही डॉक्टर्स आजही याचा उपयोग करतात.
Carbamazepine, Oxcarbazepine

कार्बमेजेपीन, ऑक्सकार्बजेपीन – उदा. टेग्रीटल, ऑक्सिटोल, इत्यादी

नवीन औषधे. काही रुग्णांमध्ये जास्त प्रभावी.
Valproate

वालप्रोएट – उदा. डिपाकोटे, वाल्परिन, इत्यादी

नवीन औषधे. काही रुग्णांमध्ये जास्त प्रभावी.
लेवेटीरासिटाम,ब्रिवारासिटाम – उदा. लेविपिल, लेवेरा, ब्रेविपिल, ब्रीवीॲक्ट, इत्यादीआधुनिक औषधे. खूपच कमी दुष्परिणाम, पण यांच्या वापराने काही रुग्णांमध्ये राग वाढू शकतो.

तुम्हाला येणारे झटके, तुमच्या शरीराची जडणघडण, स्वभाव, आणि विचार करण्याची शक्ती या गोष्टींच्या आधारावर डॉक्टर यांच्यापैकी एक किंवा दोन औषधे देतो.

पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कोणत्या रुग्णावर कोणते औषध प्रभावी ठरेल हे जाणून घेण्यासाठी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही. ना भारतात, ना अमेरिकेत.

परिणामकारक औषधे खूप विचारपूर्वक, आणि अनुभवाच्या आधारावर निवडावे लागतात.

कदाचित, असे होऊ शकते की पहिल्या औषधाचा परिणामच जाणवणार नाही. मग, दुसऱ्यांदा डॉक्टरांनी आणखी विचारपूर्वक दुसरे औषध लिहून दिले, तरीही कदाचित होऊ शकते की त्याचाही परिणाम दिसून येणार नाही.

हा दोष अप्सरमारच्या आजाराचा आहे, डॉक्टरचा नाही. अशा प्रकारच्या अप्सरमारच्या आजाराला “रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी” म्हणतात. या प्रकारच्या रुग्णांमध्ये कोणत्याही औषधाने अप्सरमारचे झटके थांबत नाहीत.

अशा प्रकारच्या रुग्णांना अप्सरमारच्या शस्त्रक्रियेची गरज असते.

जर २-३ औषधांचा वापर करूनही अप्सरमारचे झटके थांबत नसतील, तर मग शस्त्रक्रियेबद्दल जरूर विचार केला पाहिजे.

२) अप्सरमारची शस्त्रक्रिया (एपिलेप्सी सर्जरी)

जर औषधांनी अप्सरमारचे झटके थांबत नसतील, तर शस्त्रक्रियेबद्दल विचार केला पाहिजे.

Temporal lobectomy surgery
एपिलेप्सी सर्जरी मध्ये मेंदूच्या वाईट भागाला काढून टाकतात

मेंदूत जेथे अनियंत्रित विद्युत प्रवाह उत्पन्न होत असतो तेथील एका छ्योट्या भागाला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते. असे केल्याने अप्सरमारचे झटके थांबतात. मेंदूतील चांगले भाग योग्य रीतीने कार्य करू शकतात.

अप्सरमारची शस्त्रक्रिया लक्षपूर्वक, खूप विचार करून करावी लागते, जेणेकरून शस्त्रक्रिया केल्यानंतर अप्सरमारचे झटके खरोखर थांबतील.

वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर

तरीपण, काही लोकांमध्ये मेंदूतील एखाद्या भागाला काढून टाकणे शक्य नसते, किंवा काढून टाकल्यानंतरही अप्सरमारचे झटके येत असतात. अशा लोकांनी वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटरबद्दल (Vagus Nerve Stimulator in Marathi – VNS) विचार केला पाहिजे.

VNS Vagus Nerve Stimulator
नेहमीची शास्त्क्रिया (सर्जरी) करता आली नाही, तर वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर (VNS) च्या बारीक सर्जरीनी  फायदा होऊ शकतो

वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर एक लहानशी बॅटरी आहे, जी छातीच्या त्वचेखाली बसवली जाते. यातून निघणारी बारीक वायर मानेच्या त्वचेखालच्या बारीक नसापर्यंत (वेगस) जाते. या उपकरणाला लावण्याची प्रक्रिया अगदी छोटीशी असते.

बॅटरीतून निघणाऱ्या बारीक विद्युत प्रवाहामुळे मेंदू संतुलित राहतो, आणि अप्सरमारचे झटके कमी येतात. ५०% रुग्णांमध्ये झटक्यांचे प्रमाण ५०% टक्क्यांनी कमी होते, आणि जवळजवळ २०% लोकांमध्ये अप्सरमारचे झटके पूर्णपणे बंद होतात.

सारांश

१. Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) समजून घेण्याच्या आधी Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) हा लेख वाचणे आवश्यक आहे.

२. झटके येणे (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

३. झटके येणे (सीझर) १-२ मिनिटे चालणाऱ्या घटनेला म्हणतात.

४. Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) वारंवार झटके येण्याची मेंदूची प्रवृत्ती.

५. अप्सरमारचे वेगवेगळे प्रकार आहेत. याचे इतके प्रकार आहेत की या सर्वांबद्दल येथे सांगणे अशक्य आहे.

अप्सरमारची तपासणी:

१. एम-आर-आय द्वारे मेंदूची चित्रे काढली जातात. “३ टेस्ला” एम-आर-आय अतिशय चांगला असतो.

२. ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.

अप्सरमारचा उपचार:

१. अप्सरमारच्या (अपस्मार)/एपिलेप्सी उपचारासाठी कितीतरी औषधे उपलब्ध आहेत.

२. जर २-३ औषधे देऊनही फायदा होत नसेल, तर अप्सरमारच्या शस्त्रक्रियेबद्दल किंवा वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटरबद्दल (VNS) विचार केला पाहिजे.

३. अप्सरमारची शस्त्रक्रिया किंवा VNS बद्दल जगात कोणीही १००% हमी देऊ शकत नाही. पण, लक्षपूर्वक, मन लावून हे उपचार केल्यास, कितीतरी रुग्णांना बऱ्यापैकी फायदा होतो.

 

 

 

सावधगिरीचा इशारा: ही माहिती फक्त शिक्षणासाठी देण्यात आलेली आहे. रोगनिदान आणि औषधोपचारासाठी योग्य डॉक्टरांची स्वतः भेट घ्या. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या औषधांचा डोस वाढवू नका किंवा औषधे पूर्णपणे बंद करू नका!!द करे!!

डॉ सिद्धार्थ खारकर

डॉ. सिद्धार्थ खारकर हे “आउटलुक इंडिया” आणि “इंडिया टुडे” यांसारख्या नियतकालिकांच्या मते मुंबईतील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट्सपैकी एक आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे न्यूरोलॉजिस्ट, मिरगी (अपस्मार) आणि पार्किंसन्स रोगाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी भारत, अमेरिका, आणि इंग्लंडमधील सर्वोत्तम वैद्यकीय संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

परदेशात कितीतरी वर्षे कार्य केल्यानंतर, ते भारतात परतले, आणि आता ते महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थायिक झालेले आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे आंतरराष्ट्रीय पार्किन्सन्स आणि मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या एका संशोधन गटाचे आंतरराष्ट्रीय संचालक आहेत.

फोन 022-4897-1800

ईमेल पाठवा

2 thoughts on “एपिलेप्सीचा अर्थ (प्रकार व 2 उपचार!) Epilepsy meaning in Marathi”

 1. Dr mazi mulgi 5 varshachi ahe tila gelya 3 varsha pasun Valparin 5 ml amhi detoy ti khupch hyper active aste plz help me for this

  Reply
  • They should be screened for ADHD. Please meet your nearest neurologist and if needed a psychiatrist for this purpose.

   Reply

Leave a Comment

Noted as one of the best Neurologists in Mumbai

India Today Magazine - 2020, 2021, 2022, 2023

Outlook India Magazine - 2021, 2023

Ex-Assistant Professor, University of Alabama, USA

Outlook India - Best neurologist in Mumbai