पार्किंसंस चा अर्थ (३ लक्षणं, ३ उपचार!) – Parkinson’s disease meaning in Marathi- Drkhakar

जर तुम्हाला पार्किंसंस हा आजार असेल, तर मग तुम्हाला Parkinson’s disease meaning in Marathi (पार्किंसंसचा अर्थ) माहीत असणे गरजेचे आहे!

पण, खरे सांगायचे झाल्यास, सर्वांनाच पार्किंसंसची लक्षणे माहीत असली पाहिजेत. अनेक वयस्कर लोकांमध्ये ही लक्षणे असतात, पण या लक्षणांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते.

ही दुःखाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला Parkinson’s disease meaning in Marathi (पार्किंसंसचा अर्थ) माहीत होईल, तेव्हा तुम्हाला कळेल की पार्किंसंस रोगावर उपचार शक्य आहे.

पार्किंसंसचा अर्थ (Parkinson’s disease meaning in Marathi) पूर्ण पाने जाणून घेण्या साठी, आपण ह्या गोष्टीं बद्दल शिकूया:

पार्किंसंस का अर्थ पूरी तरह समझने के लिए हमे ३ चीज़े जननी होगी:

१. पार्किंसंस रोग के ३ मुख्या लक्षण है:

पार्किंसंस ची ३ लक्षणं
१ . हाता – पायाचा कंप
२ . हळूपणा
३ . स्नायू घट्ट होणे

२. पार्किंसंस चे २ मुख्य उपचार आहेत :

  • पार्किंसंस ची औषधं
  • पार्किंसंस चे नवीन उपचार (डीप-ब्रेन-स्टिमुलेशन -DBS आणि स्टेम-सेल थेरेपी)

३. ह्या दोन गोष्टी सोडून, आपण पार्किंसंस का होतो, त्याबद्दल पण बोलूया.

Parkinson's disease meaning in Hindi या पार्किंसंस का अर्थ
Parkinson’s disease meaning in Marathi (पार्किंसंसचा अर्थ) जाण्या साठी ह्या चार गोष्टी समझून घ्या.

मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो.

मी भारतातील पार्किन्सन्स आणि (Epilepsy specialist in Mumbai) एपिलेप्सी तज्ञ आहे आणि मी भारतात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी शस्त्रक्रिया (Epilepsy surgery in India) प्रदान करतो.

आता आपण पार्किंसंसचा अर्थ [Parkinson’s disease meaning in Marathi] समजून घेऊ या. चला, या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल वाचूया.

Tremor of Parkinson’s disease in Marathi — पार्किंसंस रोगाचे कंप

पार्किंसंस रोगाची तीन मुख्य लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.

पार्किंसंस रोगाची लक्षणे
१. हात किंवा पायांमध्ये कंप
२. सर्व कार्ये, जसे की चालणे-फिरणे मंदावणे
३. हात किंवा पायांमध्ये ताठरपणा किंवा कडकपणा

चला, आधी आपण पार्किंसंसच्या कंपांविषयी चर्चा करू या.

१. कंप (ट्रेमर, Tremor)

हात किंवा पायांमध्ये कंप होण्यामागे कितीतरी कारणे असू शकतात. सर्व कारणे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पण, आपण येथे फक्त पार्किंसंसच्या कंपांविषयी चर्चा करणार आहोत.

जेव्हा तुम्ही विश्राम करण्यासाठी निवांतपणे बसलेले असता तेव्हादेखील पार्किंसंसमुळे कंपे होतात. हे या रोगाचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणून पार्किंसंसच्या कंपाला “विश्राम कंप” किंवा इंग्रजीमध्ये “रेस्ट ट्रेमर (rest tremor)” देखील म्हटले जाते.

पार्किंसंसमुळे होणारे हातांचे कंप पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा:

पार्किंसंसचे कंप फक्त हातांमध्येच होत नाही, तर पायांमध्ये किंवा डोक्यामध्ये देखील होऊ शकते.

पार्किंसंसचे कंप बहुतेक वेळा कुटुंबातील सदस्यांच्या किंवा नातेवाइकांच्या लक्षात येते.

जसे की, रुग्ण आरामात बसून टीव्ही पाहत आहे. रुग्णाच्या मुलाला हातांमध्ये कंप दिसते! तो म्हणतो:

बाबा!! तुमचे हात थरथर का कापत आहेत??

माझ्या क्लिनिकमध्ये असे मला वारंवार ऐकायला मिळते. हे आहे “विश्राम कंपन” किंवा “रेस्ट ट्रेमर”. हेच आहे पार्किंसंसचे कंपन.

पार्किंसंसच्या कंपनाचे आणखी एक उदाहरण पाहण्यासाठी, खाली दिलेला व्हिडिओ पाहा. तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीला जास्त कंपन होत आहे.

Parkinson’s disease meaning in Marathi जाणून घेण्याचे पहिले पाऊल म्हणजे पार्किंसंसची कंपने ओळखणे.

कंपनांव्यतिरिक्त, पार्किंसंसच्या इतर लक्षणांविषयी जाणून घेणेदेखील आवश्यक आहे. ही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

२. हालचाली मंदावणे (ब्रॅडी-कायनेसिया, Bradykinesia):

Parkinson’s disease meaning in Marathi जाणून घ्या साठी त्याचे अझून एक महत्वाचे लक्षण माहिती असणे महत्वाचे आहे: रुग्णाचे चालणे-फिरणे मंदावते!

असे झाल्यास, कधीकधी नातेवाईक याचा चुकीचा अर्थ काढतात. कधीकधी रुग्णाचे नातेवाईक मला येऊन सांगतात:

आई आता खूपच आळशी बनली आहे! एकाच ठिकाणी बसून राहते!

याला आळस मुळीच समजू नका. हे पार्किंसंसचे लक्षण आहे. या लक्षणाला हळूपणा, किंवा इंग्रजीमध्ये “ब्रॅडी-कायनेसिया” असे म्हणतात.

पार्किंसंसचे रुग्ण सहसा पुढे वाकून चालतात. ते हळूहळू चालतात. दिशा बदलताना ते कधीकधी जागच्या जागी थांबून राहतात, आणि पावले पुढे टाकू शकत नाहीत.

अशा प्रकारे चालण्याचा हा व्हिडिओ पाहा:

३. स्नायूंचा घट्टपणा (रिजिडिटी, Rigidity)

हाता-पायाचे स्नायू घट्ट होतात. कधीकधी हातपाय इतके घट्ट होऊन जातात की हालचाल करणे देखील कठीण असते.

बहुतेक वेळा रुग्ण स्वतःच अशा प्रकारच्या ताठरपणाबद्दल तक्रार करतो.

अनेकदा रुग्ण मला असे सांगतात:

डॉक्टर या बाजूचा हात आणि पाय दोन्ही जड वाटतात. चालताना पाय उचलायला त्रास होतो!

Combing

हातांमधील ताठरपणामुळे तुम्हाला तुमचे केस करणेदेखील कठीण वाटू शकते. पार्किंसंस रोगाच्या लक्षणांपैकी ही तीन लक्षणे सर्वात महत्त्वाची आहेत. पण, पार्किंसंसच्या लक्षणांबद्दल तुम्हाला जर आणखी तपशीलवारपणे जाणून घ्यायचे असेल, तर येथे क्लिक करा [पार्किंसंस रोगाची लक्षणे].

Cause of Parkinson’s disease in Marathi — पार्किंसंस रोगाची कारणे

Parkinson’s disease meaning in Marathi किंवा पार्किंसंसचा अर्थ जाणून घेण्यासाठी पार्किंसंस रोगाची कारणे माहीत असणे आवश्यक आहे.

तर मग, पार्किंसंस होग का होतो? पार्किंसंस रोगाची कारणे कोणती आहेत? चला तर जाणून घेऊ या.

आपल्या मेंदूमध्ये अनेक भाग आहेत. हे भाग एकमेकांशी विद्युत प्रवाह आणि रासायनिक पदार्थांद्वारे संपर्क साधतात.

आपल्या मेंदूच्या मागील बाजूला एक खास भाग असतो. याला मिडब्रेन (मध्यमेंदू) म्हणतात.

मिडब्रेन एका खास रासायनिक पदार्थाची निर्मिती करतो. या खास रासायनिक पदार्थाचे नाव आहे डोपामीन.

सामान्यत:, मिडब्रेनमध्ये निर्माण झालेला डोपामीन मेंदूच्या समोरील भागांमध्ये जातो. तेथे डोपामीन मेंदूच्या समोरील भागांना उत्तेजित करतो.

मेंदूमध्ये जे लाल रंगात दिसत आहे त्याला मिडब्रेन म्हणतात. मिडब्रेन डोपामीनची निर्मिती करून मेंदूच्या समोरील भागांमध्ये पाठवतो.

midbrain dopamine
लाल रंगाच्या भागाला मिडब्रेन म्हणतात. तिकडे डोपामिन बनवले जाते, आणि ते मेंदूच्या पुढच्या भागांना पुरवले जाते.

मग, मेंदूचे समोरील भाग माणसांना चालण्या-फिरण्यात मदत करतात. जेव्हा या समोरील भागांचे कार्य बरोबर असते, तेव्हा माणूस झटपट हालचाल करू शकतो. तो कोठेच धडपडत नाही, आणि त्याच्या हातापायांमध्ये कंपनदेखील होत नाही.

पार्किंसंस रोगामध्ये मिडब्रेनचे कार्य प्रभावित होते. ते कमी प्रमाणात डोपामीन बनवते.

असे का होते, हे जगात कोणीही अचूकपणे सांगू शकत नाही. काही लोकांमध्ये हे आनुवंशिक कारणांमुळे होऊ शकते. पण, बहुतेक लोकांमध्ये मिडब्रेनचे कार्य का प्रभावित होते याचे कारण शोधूनही सापडत नाही.

पार्किंसंसमध्ये मिडब्रेनच्या पेशी मरून जातात, आणि त्यामुळे डोपामीनचे प्रमाण कमी होते.

midbrain dopamine parkinsons
मिडिब्रुईन पासून येणारे डोपामिन कमी झाल्या मुले पार्किंसंस ची लक्षणं होतात.

जेव्हा डोपामीनचे प्रमाण कमी होते, तेव्हा मेंदूच्या समोरील बाजूच्या भागांचे कार्य मंदावते.

माणसाच्या हालचाली मंद होतात. त्याच्या हातांमध्ये कंपन होते. त्याचे शरीर ताठऱ बनते. डॉक्टर याच आजाराला पार्किंसंस असे म्हणतात.

Parkinson’s disease meaning in Marathi आता तुम्हाला कळले असेल…

Parkinson’s disease meaning in Marathi — पार्किंसंसचा अर्थ

तर मग, आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून तुम्हाला Parkinson’s disease meaning in Marathi — पार्किंसंसचा अर्थ चांगल्या रीतीने समजला असेल.

पण फक्त Parkinson’s disease meaning in Marathi — पार्किंसंसचा अर्थ माहीत असणे पुरेसे नाही.

Parkinson’s meaning in Marathi समजण्यासाठी तिसरी गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, आणि ती गोष्ट म्हणजे, पार्किंसंस रोगाच्या उपचाराबद्दल जाणून घेणे.

doctor 4229348 1920
Parkinson’s disease meaning in Marathi (पार्किंसंसचा अर्थ) समझण्या साठी पार्किंसंस चा उपचार पण जाणून घेणे गरजेचे आहे.

चला, आपण पार्किंसंस रोगाच्या उपचाराबद्दल जाणून घेऊ या.

पण त्याआधी, तुम्हाला माहीत आहे का, की काही औषधे अशीही आहेत ज्यांच्या वापरामुळे पार्किंसंस रोगासारखी लक्षणे पाहायला मिळतात???

Medications causing Parkinson’s disease in Marathi — पार्किंसंस रोगास कारणीभूत होणारी औषधे

काही औषधे डोपामीनच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. या औषधांना डोपामीन ब्लॉकर्स म्हणतात.

डोपामीन-ब्लॉकर (त्रिकोण) डोपामीनला (गोल) मेंदूस चिकटू देत नाहीत. त्यामुळे डोपामीन आपले कार्य प्रभावीपणे करू शकत नाही.

Receptor e1622319661273
डोपामाइन-ब्लॉकर (त्रिकोण) डोपामाइन (गोल) ला मेंदू वर चिटकू देत नाही. त्या मुले मेंदूला डोपामिन मिळत नाही, आणि पार्किंसंस ची लक्षणं होतात.

या औषधांमुळे तुम्हाला पार्किंसंस रोगासारखी लक्षणे जाणवू शकतात. जर तुम्हाला आधीपासूनच पार्किंसंस रोग असेल, तर या औषधांमुळे पार्किंसंसची लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात.

जर या औषधांच्या वापरामुळे एखाद्या रुग्णामध्ये पार्किंसंस रोगाची लक्षणे दिसत असतील, तर याला “ड्रग-इंड्यूस्ड पार्किन्सनिझ्म” किंवा “मेडिकेशन इंडिकेटेड पार्किन्सनिझ्म” असे म्हटले जाते.

ही आहे पार्किंसंस रोगाला कारणीभूत होणाऱ्या औषधांची यादी:

औषधांचे कार्यऔषधांचे नाव
१. मानसिक आजाराशी संबंधित त्रास, जसे की सिझोफ्रेनियाच्या उपचारासाठी वापरली जाणारी अनेक औषधेहेलोपेरिडॉल, रिस्पेरडॉल, ओलांझापीन, अरिपीप्राझॉल, ट्रायफ्लुओपेराझीन आणि इतर अनेक औषधे. क्लोझापीन आणि क्वेटायपीन यांच्यामुळे सहसा समस्या निर्माण होत नाही.
२. मनःस्थिती (मूड) आणि नैराश्य (डिप्रेशन) यांच्या उपचारासाठीची काही औषधेफ्लुफेनाझीन, ट्रानिलसायप्रोमीन, लिथियम
३. उल्टी थांबवणारी काही औषधेमेटोक्लोप्रोमाइड, लेवोसलपीराइड, डोमपेरिडोनची उच्च मात्रा ३०-४० मिलिग्रॅम/दिवस, फ्लुनारीझीन, कधीकधी सिनारीझीन
४. हृदय आणि रक्तदाब (ब्लड प्रेशर) यांच्यासाठीची काही औषधेअमियोडेरॉन, मिथाइल-डोपा

 

रुग्णाला ही औषधे मुळीच देऊ शकत नाही असे नाही. काही लोकांना असे काही आजार उद्भवतात, की ज्यामुळे त्यांना ही औषधे द्यावीच लागतात.

पण, तुम्हाला जर आधीपासूनच पार्किंसंस रोग असेल, तर मग तुम्ही या औषधांपासून शक्य होईल तितके दूरच राहा.

Treatment of Parkinson’s disease in Marathi — पार्किंसंस रोगावरील उपचार

पार्किंसंस रोगाच्या उपचारासाठी सामान्यतः या ५ परिणामकारक औषधांचा वापर केला जातो.

के उपचार ५ असरदार दवाइयां 2 e1622321061417
पार्किंसंस रोगावरील उपचार – ५ औषधं लक्षात ठेवा

पार्किंसंस रोगावरील उपचार — ही ५ औषधे लक्षात ठेवा.

१. लेवोडोपा:

हे औषध मेंदूत जाते, आणि तेथे जाऊन डोपामीनमध्ये परिवर्तीत होते!

पार्किंसंस रोगाच्या उपचारात हे सर्वात परिणामकारक औषध आहे.

२. एंटाकॅपोन:

हे औषध लेवोडोपाचा साथीदार आहे. एंटाकॅपोनमुळे लेवोडोपाचा प्रभाव लवकर सुरू होतो आणि जास्त वेळपर्यंत राहतो.

३. अमंटाडाइन

हे औषध लेवोडोपाचा दुसरा साथीदार आहे.

पार्किंसंस रोगाने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांचे हात, पाय आणि मान काही वर्षांनंतर अतिशय उत्तेजित होऊन जास्त प्रमाणात हालू लागतात. अशा प्रकारचे हालणे, लेवोडोपा औषध घेणे सुरू केल्यानंतर काही काळपर्यंत वाढत जाते.

अशा प्रकारे अतिशय उत्तेजित होऊन हालण्याला डिस्कायनेसिया (dyskinesia) असे म्हणतात. अशा प्रकारच्या हालण्याला अमंटाडाइन खूपच कमी करते, आणि बहुतेक वेळा पूर्णपणे बंद करते.

४. डोपामीन ॲगोनिस्ट (प्रॅमीपेक्सोल, रोपिनिरोल)

ही औषधे डोपामीनसारखी दिसतात. म्हणून ही औषधे डोपामीनचे कार्य काही प्रमाणात करू शकतात.

पण, पुष्कळ लोकांना या औषधांमुळे झोप येते. काही जण या औषधांमुळे उत्तेजित होऊ शकतात. त्यामुळे, मी या औषधांचा वापर खूप कमी करतो.

५. MAO-B अँटागोनिस्ट (रसाजिलिन, सिलेजिलिन)

ही औषधेदेखील डोपामीनला आणखी प्रभावकारी बनवतात. पण, ही औषधे एंटाकॅपोनइतकी सक्षम नसतात.

म्हणून, मी या औषधांचा वापरदेखील कमीच करतो.

पार्किंसंस रोगाच्या औषधांविषयी तपशीलवारपणे वाचण्यासाठी या वेबसाइटवरील हा लेख वाचा [पार्किंसंस रोगावरील उपचार — ५ प्रभावकारी औषधे].

New Treatments of Parkinson’s disease in Marathi — पार्किंसंस रोगावरील नवीन उपचार

डीप-ब्रेन-स्टिम्युलेशन

पार्किंसंस रोगावरील नवीन उपचारांच्या यादीत डीप-ब्रेन-स्टिम्युलेशनचे (DBS) नाव सर्वात पहिले येते.

एक डीप-ब्रेन-स्टिम्युलेशन व्यवस्था — बॅटरी / पेसमेकरला छातीच्या त्वचेखाली स्थापित केले जाते. मेंदूच्या आतमध्ये जाणाऱ्या वायरला “इलेक्ट्रोड” म्हटले जाते.

DBS e1578942163505
डीप-ब्रेन-स्टिमुलेशन च्या बैटरीला छाती च्या त्वचे खाली ठेवले जाते. त्यापासुन निघणारी एक बारीक वायर मेंदू पर्यंत जाते.

डीप-ब्रेन-स्टिम्युलेशन (DBS) एक लहानसे यंत्र (मशीन) आहे. या यंत्राची बॅटरी छातीच्या त्वचेखाली लावलेली असते. या बॅटरीतून निघणारे दोन वायर मेंदूत जातात.

हे वायर मेंदूला उत्तेजित करतात, आणि डोपामीनच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी अनेक लक्षणे कमी करतात.

पार्किंसंस रोगावरील नवीन उपचार डीप-ब्रेन-स्टिम्युलेशनमुळे (DBS) पुष्कळ लोकांना बराच फायदा होतो. पण, हा उपचार पार्किंसंस रोगावरील चमत्कारिक उपचार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

डीप-ब्रेन-स्टिम्युलेशनविषयी (DBS) तपशीलवारपणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा [पार्किंसंस रोगावरील नवीन उपचार: डीप-ब्रेन-स्टिम्युलेशन — पार्किंसंस रोगावरील चमत्कारिक उपचार?]

 स्टेम-सेल थेरपी

पार्किंसंस रोगावरील नवीन उपचारांच्या यादीतील एक नवीन नाव आहे, स्टेम-सेल थेरपी.

स्टेम-सेल हे आपल्या शरीरातील खास पेशी आहेत.

स्टेम-सेल पेशी आणखी कितीतरी प्रकारच्या पेशी बनवू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टेम-सेल पेशींमध्ये शरीरातील इतर कोणतेही पेशी, शरीरातील इतर कोणतेही अंग बनवण्याचे सामर्थ्य आहे.

स्टेम-सेल पेशी शरीरातील इतर कोणतेही पेशी, शरीरातील इतर कोणतेही अंग बनवू शकतात.

StemCells
स्टेम-सेल चमत्कारी पेश्या असतात. शरीराचा कोणताही भाग ते बनवू शकतात.

पण, या चमत्कारिक पेशींचा वापर पार्किंसन्स रोगाच्या उपचारात कसा करता येईल हे अजूनही कोणालाच माहीत नाही.

या विषयावर जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. मला आशा आहे की येणाऱ्या वर्षांमध्ये स्टेम-सेल थेरपी पार्किंसन्स रोगावरील चमत्कारिक उपचार बनू शकते.

पण, अजून तरी ती वेळ आलेली नाही.

आजच्या तारखेला (२०२१), माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्टेम-सेल थेरपीचा वापर फक्त संशोधन म्हणून, संशोधनाच्या ठिकाणी, पैशाचा विचार न करता, वैज्ञानिकांच्या देखरेखीखालीच करावा.

पार्किंसन्स रोगाची अशी लक्षणे ज्यांच्याकडे बरेच डॉक्टर आणि पेशंट दुर्लक्ष करतात

चालण्या-फिरण्यात होणाऱ्या त्रासाव्यतिरिक्त, पार्किंसन्स रोगाची इतरही काही लक्षणे आहेत.

या इतर लक्षणांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. पण, असे केल्यास, पार्किंसन्स रोगाचा पूर्णपणे उपचार होऊ शकणार नाही.

ही लक्षणेदेखील पार्किंसन्स रोगाची असू शकतात, हे ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

पार्किंसन्स रोगामध्ये बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होऊ शकतो, म्हणजे पोट साफ होत नाही.

Constipated
मुलावरोध  (constipation) आणि बरेच असे त्रास पार्किंसन्स ची लक्षणं असू शकतात.

म्हणून, Parkinson’s disease meaning in Marathi जाण्या साठी, हि छोटी-छोटी लक्षणे जाणून घेणे पण गरजेचे आहे.

त्यांच्यापैकी काही मुख्य लक्षणांबद्दल, आणि उपचारांबद्दल मी येथे माहिती देत आहे:

पार्किंसन्स रोगाची लक्षणे (इतर)उपचार
१. विचार करण्यात आणि स्मरणशक्तीचा त्रास (डिमेंशिया)औषधे

पार्किंसन्स रोग आणि डिमेंशियाबद्दल एक अतिशय उत्तम लेख वाचण्यासाठी [येथे क्लिक करा]

२. बद्धकोष्ठता (Constipation) — पोट साफ होत नाही, त्रास होतो— दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या. जर तुम्हाला हृदयाचा किंवा मूत्रपिंडाचा (किडनी) आजार नसेल, तर तुम्ही दररोज ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

— दररोज १-२ केळी खा. कच्च्या भाज्या आणि फळे खा.

— दिवसातून कमीत कमी १५ मिनिटे पायी चाला. दिवसभर झोपून राहण्याऐवजी खुर्चीवर बसणे केव्हाही चांगले.

३. रात्री स्वप्नात ओरडणे (रेम बिहेव्हियर डिसऑर्डर — RBD)औषधे
४. दुःखी राहणे (नैराश्य — Depression)औषधे

मानसोपचार तज्ज्ञासोबत बोलणे (Counselling)

५. झोप न येणे, किंवा वारंवार झोप मोडणेऔषधे
६. अतिशय उत्तेजित होणे किंवा भास होणे (Hallucinations)पार्किंसन्स रोगावरील काही औषधे, जसे की ट्राय-हेक्सी-फेनिडिल (Pacitane) आणि अमंटाडाइन यांच्यामुळे काही लोकांना भास/वाईट स्वप्न यांचा त्रास होऊ शकतो.

ही औषधे कमी करण्याबद्दल तुम्ही आपल्या डॉक्टरांशी बोला.

७. बोलायला त्रास होणे (Dysarthria)पार्किंसन्स रोगाच्या औषधांचा डोस वाढवण्याची आवश्यकता असू शकते.

स्पीच थेरपिस्ट (Speech therapist) द्वारे प्रशिक्षण घेतल्याने त्रास कमी होऊ शकतो.

८. अन्न गिळायला त्रास होणे (Dysphagia)वरीलप्रमाणे.
९. लैंगिक संबंध ठेवण्यात त्रास होणे (Impotence)औषधे

इत्यादी…

Parkinson’s disease meaning in Marathi (पार्किंसन्सचा अर्थ) सारांश:

१. पार्किंसन्सचा अर्थ चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी त्या रोगाच्या ४ पैलूंबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे: लक्षणे, कारणे, उपचार, आणि नवीन उपचार.

२. पार्किंसन्स रोगाची तीन मुख्ये लक्षणे लक्षात ठेवा: कंपन, हळूपणा आणि स्नायूंचा घट्टपणा.

३. आपण पार्किंसन्स रोगावरील पाच औषधांविषयी चर्चा केली. यांपैकी सर्वात प्रभावकारी औषध आहे लेवोडोपा.

४. पार्किंसन्स रोगावरील नवीन उपचार डीप-ब्रेन-स्टिम्युलेशनमुळे (DBS) बराच फायदा होऊ शकतो.

५. वर्तमान काळात (२०२१), स्टेम-सेल थेरपीचा फक्त संशोधन म्हणूनच विचार करणे चांगले.

६. स्मरणशक्तीचा त्रास होणे, रात्री झोपेत ओरडणे, बद्धकोष्ठता, इत्यादीदेखील पार्किंसन्स रोगाची लक्षणे आहेत. यांच्यावर उपचार उपलब्ध आहे.

Keywords – पार्किंसंस चा अर्थ (३ लक्षणं, ३ उपचार!), parkinson rog in hindi, Tremor of Parkinson’s disease in Marathi, कंपवात आयुर्वेदिक उपाय, thalassemia meaning in marathi, पार्किंसन रोग व्यायाम, parkisans decise चे प्राथमिक लक्षणे

About the writer:

मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो.

सावधगिरीचा इशारा: ही माहिती फक्त शिक्षणासाठी देण्यात आलेली आहे. रोगनिदान आणि औषधोपचारासाठी योग्य डॉक्टरांची स्वतः भेट घ्या. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या औषधांचा डोस वाढवू नका किंवा औषधे पूर्णपणे बंद करू नका!!द करे!!

डॉ सिद्धार्थ खारकर

डॉ. सिद्धार्थ खारकर हे “आउटलुक इंडिया” आणि “इंडिया टुडे” यांसारख्या नियतकालिकांच्या मते मुंबईतील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट्सपैकी एक आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे न्यूरोलॉजिस्ट, मिरगी (अपस्मार) आणि पार्किंसन्स रोगाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी भारत, अमेरिका, आणि इंग्लंडमधील सर्वोत्तम वैद्यकीय संस्थांमधून शिक्षण घेतले आहे.

परदेशात कितीतरी वर्षे कार्य केल्यानंतर, ते भारतात परतले, आणि आता ते महाराष्ट्रातील मुंबई येथे स्थायिक झालेले आहेत.

डॉ. सिद्धार्थ खारकर हे आंतरराष्ट्रीय पार्किन्सन्स आणि मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या एका संशोधन गटाचे आंतरराष्ट्रीय संचालक आहेत.

फोन 022-4897-1800

ईमेल पाठवा

6 thoughts on “पार्किंसंस चा अर्थ (३ लक्षणं, ३ उपचार!) – Parkinson’s disease meaning in Marathi- Drkhakar”

  1. I am Prakash Patil from Karad. My Father suffering this stage slow motion and left leg Tremor during walk.
    In 2006 he was suffer heart attacks. Then do angioplasty. But in 2013 he suffered brain hammrag 4×3.5 mm blood clot. But he was cure only medicine. Blood clot is in memory location. DR.say age increases then he loss some time history or he not identified immediately like memory loss.
    Jan 2022 he suffer COVID-19. Mild symptoms. He is also Diabetic. Nov 2022 suddenly he unconscious 2 hr. Like no enery in body after hospitalize the result is blood sodium level decrease. Before Nov 2022 that he is good walk. But Dec 2022 he not walk without support. Suffer body Tremor. Please suggest.

    Reply
    • I think you need to meet your nearest neurologist. They will screen for normal pressure hydrocephalus and parkinsonism.

      Reply
  2. I found your write up quiet informative for a lay man . Thanks. I have hand tremors. Post covid treatment it started a month ago.

    Reply
    • Thank you for your feedback. Yes, Covid can produce many different neurological symptoms.

      You need to visit a neurologist you dont have an underlying neurological problem. If it’s only Covid, then most Covid symptoms do resolve with time. I wish you the best.

      – Dr. Siddharth Kharkar

      Reply

Leave a Comment

Noted as one of the best Neurologists in Mumbai

India Today Magazine - 2020, 2021, 2022, 2023

Outlook India Magazine - 2021, 2023

Ex-Assistant Professor, University of Alabama, USA

Outlook India - Best neurologist in Mumbai