Category: Epilepsy / Seizures meaning in Marathi
एपिलेप्सीचा अर्थ (प्रकार व 2 उपचार!) Epilepsy meaning in Marathi Epilepsy meaning in Marathi (अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सीचा अर्थ) अर्थ आहे, वारंवार झटके येण्याचा आजार. कृपया हा लेख वाचण्याच्या आधी, हा लेख जरूर वाचा: Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) . झटके येण्याचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच, तुम्हाला अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी या शब्दांचा अर्थ माहीत होईल. Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) जाणून घेण्यासोबतच, या लेखात आपण अप्सरमारची तपासणी, आणि अप्सरमारवरील उपचाराबद्दल चर्चा करणार आहोत. अप्सरमारचा दौऱ्याचे २ मुख्य प्रकार आहेत: अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार १ . फोकल अपस्मार – छोटा अप्स्माराचा दौरा जो मेंदूच्या एकाच भागात होतो २ . जनरलाइज़्ड अपस्मार – मोठा अप्स्माराचा दौरा जो पूर्ण मेंदू मध्ये इलेक्ट्रिसिटी अनियंत्रित झाल्या मुळे होतो. अप्सरमारचा दौऱ्यावर २ मुख्य चाचण्या करतात: अप्सरमारचा दौऱ्यावर २ चाचण्या १ . MRI – मेंदू चा एक चित्रं किंवा फोटो २ . EEG – मेंदू मधल्या इलेक्ट्रिसिटी ची चाचणी अप्सरमारचा दौऱ्यावर २ उपचार आहेत: मिर्गी के २ इलाज १ . औषधं: २० पेक्षा जास्त औषधं उपलब्ध आहेत. २ . सर्जरी: रेसेक्टिव सर्जरी, VNS, DBS अश्या बऱ्याच प्रकारच्या सुरजरी उपलब्ध आहेत. मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो. मी भारतातील पार्किन्सन्स आणि (Epilepsy specialist in Mumbai) एपिलेप्सी तज्ञ आहे आणि मी भारतात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी शस्त्रक्रिया (Epilepsy surgery in India) प्रदान करतो. झटका (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार) यांच्यात फरक: झटका येणे ही एक घटना आहे. झटका एक किंवा दोन मिनिटांपर्यंत असू शकतो, आणि मग थांबतो. रुग्ण १०-२० मिनिटांमध्ये बरा होतो. https://www.youtube.com/watch?v=4iq2dvyr5Is&t=80s पण, असे जर वारंवार होत असेल, तर मग हे कोणत्या गोष्टीचे सूचक आहे? असे होणे या गोष्टीचे सूचक आहे की, तुमच्या मेंदूला झटके येण्याची प्रवृत्ती आहे. Tendency म्हणजे प्रवृत्ती. जर मेंदूला पुन्हा-पुन्हा सीझर होण्याची प्रवृत्ती असेल, तर त्याला एपिलेप्सी म्हणतात. या प्रवृत्तीला, या वारंवार झटके येण्याच्या सवयीला इंग्रजीमध्ये “एपिलेप्सी” असे म्हणतात. मराठीमध्ये याला “अप्सरमारचा (अपस्मार) आजार” म्हणतात. फरक आता स्पष्ट आहे: अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी हे आजाराचे नाव आहे. वारंवार होणाऱ्या घटनेला झटका येणे (सीझर) म्हणतात. आता तुम्हाला कळलेच असेल, की Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा (अपस्मार) अर्थ) आणि Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) असे वेगवेगळे दोन लेख का आहेत. एखाद्या व्यक्तीला झटके येतात (सीझर) हे कसे ओळखायचे? अचानकपणे होणारे काही आजार अप्सरमारच्या झटक्यांप्रमाणेच वाटू शकतात. जसे की, जर हृदयाच्या आजारामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसेल, तर तुम्ही अचानक बेशुद्ध पडू शकता! जर तुम्हाला पॅरासोम्निया नावाचा आजार असेल, तर रात्री झोपेत स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही ओरडून झोपेतून जागे होऊ शकता! तुम्हाला आठवत असेल: झटका येणे हे मेंदूतील अनियंत्रित विद्युत प्रवाहामुळे घडते. इतर बाबतींत अनियंत्रित विद्युत प्रवाह कारणीभूत नसतो. मेंदूत अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी चे वाढलं झाले तर त्याला सीझर चा झटका म्हणतात. असे जर पुन्हा-पुन्हा झाले तर त्याला एपिलेप्सी म्हणतात. पण, जेव्हा रुग्ण इस्पितळात डॉक्टरला भेटतो, तेव्हा डॉक्टर रुग्णाला अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विचारतो. जर रुग्णाला पुढील प्रकारचे झटके येत असतील ज्यामध्ये: पूर्व-संकेत होतो (जसे की, दुर्गंध, किंवा अतिशय घाबरणे, किंवा दृश्य-भास होणे, किंवा थरथरणे) १-२ मिनिटे रुग्ण काहीच प्रतिसाद देत नाही १-२ मिनिटे शरीर जोरजोरात थरथर कापते, पण डोळे उघडे राहतात झटका येऊन गेल्यावर, रुग्णाला बरे होण्यासाठी १५-४५ मिनिटे लागतात असे होत असल्यास, हे झटके अप्सरमारचे असण्याची शक्यता जास्त असते, आणि इतर एखाद्या आजारामुळे असे घडण्याची शक्यता कमी असते. कधीकधी तर डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाहीत, की रुग्णाला येणारे झटके अप्सरमारचे आहेत, की इतर कोणत्या आजाराचे. अशा वेळी, लाँग-टर्म-व्हिडिओ-ईईजी काढले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला अप्सरमार (अपस्मार) हा आजार आहे हे कसे ओळखायचे? Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत सांगतो. असे समजू या की तुम्ही डॉक्टर आहात, आणि मी एक रुग्ण आहे. समजा की मला वारंवार झटके येतात. तर तुम्ही म्हणाल की हे तर अगदी स्पष्ट आहे की माझ्या मेंदूला वारंवार झटके येण्याची प्रवृत्ती आहे. तुम्ही म्हणाल, की मला “अप्सरमार (अपस्मार)” हा आजार आहे. आणि तुम्ही मला पुन्हा झटके न येण्याची औषधे द्याल. पण, समजा मला फक्त एकदाच, किंवा पहिल्यांदा झटका येतो. तर मग आता? आता मी तुम्हाला म्हणणार, की डॉक्टर: “आता मी काय पुढच्या झटक्याची वाट बघू? कोणतीतरी चाचणी असेलच तुमच्याजवळ, ज्यामुळे कळू शकेल की माझ्या मेंदूला पुन्हा झटका येण्याची प्रवृत्ती आहे की नाही???” आणि माझे म्हणणे अगदी योग्यच आहे. अशा प्रकारचे टेस्ट/चाचण्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. यांमध्ये दोन मुख्य चाचण्या आहेत, एक आहे एम-आर-आय (MRI) आणि दुसरी आहे ई-ई-जी (EEG). ई-ई-जी ह्या टेस्टनी तुम्हाला पुन्हा-पुन्हा सीझर होण्याची प्रवृत्ती आहे कि नाही, म्हणजेच तुम्हाला एपिलेप्सी आहे कि नाही ते कळू शकते. ज्यांना झटके येतात अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत या चाचण्या केल्या जातात. जर तुम्हाला अप्सरमार (अपस्मार) हा आजार असेल, तर या चाचण्यांमुळे आजाराचे कारण शोधण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला अप्सरमारचा झटका एकदाच आला असेल, तर तुम्हाला पुन्हा झटका येण्याची शक्यता आहे की नाही हे या चाचण्यांमुळे कळू शकते. पण, या चाचण्यांबद्दल चर्चा करण्याच्या आधी, Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) पूर्णपणे समजण्यासाठी अप्सरमारचे (अपस्मार) प्रकार समजून घेऊ या. अप्सरमारचे प्रकार (Types of Epilepsy meaning in Marathi) चला तर मग Types of Epilepsy meaning in Marathi – अप्सरमारचे प्रकार, मराठीमध्ये – जाणून घेऊ या. अप्सरमारचे प्रकार समजण्यासाठी, तुम्हाला आधी Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) हा लेख वाचावा लागेल. रुग्णाला ज्या प्रकारचे झटके (सीझर) येतात, त्या प्रकारच्या अप्सरमारचे नाव त्या आजाराला दिले जाते. उदाहरणार्थ: झटक्याचे नाव अप्सरमारचा प्रकार एब्सेंट झटका एब्सेंट एपिलेप्सी मायो-क्लोनिक झटका मायो-क्लोनिक एपिलेप्सी. जर रुग्णामध्ये या आजाराची सुरुवात किशोरावस्थेत (१०-१८ वर्ष) झाली तर याला “ज्युवेनाईल मायो-क्लोनिक एपिलेप्सी” (JME) म्हटले जाते. गेलास्टिक झटका गेलास्टिक एपिलेप्सी हा पहा एब्सेंट झटका (एब्सेंट एपिलेप्सी मध्ये होणाऱ्या झटक्याचे) उद्धरण: https://www.youtube.com/watch?v=6AeylCBOREk&list=PLGaiiswnRqgkkUuEqxiFgtcD8ugOB0YcB कधीकधी अप्सरमारचे नाव, मेंदूच्या ज्या भागातून झटके येतात त्यावर अवलंबून असते. मेंदूचे चार मुख्य भाग आहेत – डोळ्यांच्या वर “फ्रंटल लोब” कानांच्या खाली “टेंपोरल लोब” आणि मागच्या बाजूस “परायटल लोब” आणि “ऑक्सिपिटल लोब” झटक्याचे नाव अप्सरमारचा प्रकार डेजा-वू झटका / जामे-वू झटका अशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब” मधून होणारी एपिलेप्सी, म्हणजे “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. हायपर-कायनेटिक झटका अशा प्रकारचे झटके सहसा “फ्रंटल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. कधीकधी “टेंपोरल लोब एपिलेप्सी” किंवा “परायटल लोब एपिलेप्सी” मध्येही होऊ शकतात. गेलास्टिक झटका अशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. झटका (सीजर) मुळे खूप जुन्या आठवणी पुन्हा येऊ शकतात. डेजा-वू झटक्या मधे “हे माझ्या बरोबर आधी पण झालाय” असा भास होतो. इत्यादी… आणि शेवटी, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येऊ शकतात. काही लोकांमध्ये अप्सरमारचे नाव इतर गोष्टींवर – जसे की, मेंदूची विचार करण्याची क्षमता, आनुवंशिकता, इत्यादींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: अप्सरमारचे प्रकार अर्थ स्टुर्ग – वेबर सिंड्रोम यामध्ये लहान मुलांना झटका येण्यासोबतच चेहऱ्यावर तांबडे
Category: Epilepsy / Seizures meaning in Marathi Read More »