
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सीचा अर्थ) अर्थ आहे, वारंवार झटके येण्याचा आजार.
कृपया हा लेख वाचण्याच्या आधी, हा लेख जरूर वाचा: Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) .
झटके येण्याचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच, तुम्हाला अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी या शब्दांचा अर्थ माहीत होईल.
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) जाणून घेण्यासोबतच, या लेखात आपण अप्सरमारची तपासणी, आणि अप्सरमारवरील उपचाराबद्दल चर्चा करणार आहोत.
अप्सरमारचा दौऱ्याचे २ मुख्य प्रकार आहेत:
अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार |
---|
१ . फोकल अपस्मार – छोटा अप्स्माराचा दौरा जो मेंदूच्या एकाच भागात होतो |
२ . जनरलाइज़्ड अपस्मार – मोठा अप्स्माराचा दौरा जो पूर्ण मेंदू मध्ये इलेक्ट्रिसिटी अनियंत्रित झाल्या मुळे होतो. |
अप्सरमारचा दौऱ्यावर २ मुख्य चाचण्या करतात:
अप्सरमारचा दौऱ्यावर २ चाचण्या |
---|
१ . MRI – मेंदू चा एक चित्रं किंवा फोटो |
२ . EEG – मेंदू मधल्या इलेक्ट्रिसिटी ची चाचणी |
अप्सरमारचा दौऱ्यावर २ उपचार आहेत:
मिर्गी के २ इलाज |
---|
१ . औषधं: २० पेक्षा जास्त औषधं उपलब्ध आहेत. |
२ . सर्जरी: रेसेक्टिव सर्जरी, VNS, DBS अश्या बऱ्याच प्रकारच्या सुरजरी उपलब्ध आहेत. |
मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो.
मी भारतातील पार्किन्सन्स आणि (Epilepsy specialist in Mumbai) एपिलेप्सी तज्ञ आहे आणि मी भारतात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी शस्त्रक्रिया (Epilepsy surgery in India) प्रदान करतो.
Table Of Contents
- झटका (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार) यांच्यात फरक:
- एखाद्या व्यक्तीला झटके येतात (सीझर) हे कसे ओळखायचे?
- एखाद्या व्यक्तीला अप्सरमार (अपस्मार) हा आजार आहे हे कसे ओळखायचे?
- अप्सरमारचे प्रकार (Types of Epilepsy meaning in Marathi)
- अप्सरमारची तपासणी (Investigation of Epilepsy meaning in Marathi)
- अप्सरमारचा उपचार (Treatment of Epilepsy meaning in Marathi)
- सारांश
- डॉ सिद्धार्थ खारकर
झटका (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार) यांच्यात फरक:
झटका येणे ही एक घटना आहे. झटका एक किंवा दोन मिनिटांपर्यंत असू शकतो, आणि मग थांबतो. रुग्ण १०-२० मिनिटांमध्ये बरा होतो.
पण, असे जर वारंवार होत असेल, तर मग हे कोणत्या गोष्टीचे सूचक आहे?
असे होणे या गोष्टीचे सूचक आहे की, तुमच्या मेंदूला झटके येण्याची प्रवृत्ती आहे.
या प्रवृत्तीला, या वारंवार झटके येण्याच्या सवयीला इंग्रजीमध्ये “एपिलेप्सी” असे म्हणतात. मराठीमध्ये याला “अप्सरमारचा (अपस्मार) आजार” म्हणतात.
फरक आता स्पष्ट आहे:
- अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी हे आजाराचे नाव आहे.
- वारंवार होणाऱ्या घटनेला झटका येणे (सीझर) म्हणतात.
आता तुम्हाला कळलेच असेल, की Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा (अपस्मार) अर्थ) आणि Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) असे वेगवेगळे दोन लेख का आहेत.
Table Of Contents
- झटका (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार) यांच्यात फरक:
- एखाद्या व्यक्तीला झटके येतात (सीझर) हे कसे ओळखायचे?
- एखाद्या व्यक्तीला अप्सरमार (अपस्मार) हा आजार आहे हे कसे ओळखायचे?
- अप्सरमारचे प्रकार (Types of Epilepsy meaning in Marathi)
- अप्सरमारची तपासणी (Investigation of Epilepsy meaning in Marathi)
- अप्सरमारचा उपचार (Treatment of Epilepsy meaning in Marathi)
- सारांश
- डॉ सिद्धार्थ खारकर
एखाद्या व्यक्तीला झटके येतात (सीझर) हे कसे ओळखायचे?
अचानकपणे होणारे काही आजार अप्सरमारच्या झटक्यांप्रमाणेच वाटू शकतात. जसे की, जर हृदयाच्या आजारामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसेल, तर तुम्ही अचानक बेशुद्ध पडू शकता! जर तुम्हाला पॅरासोम्निया नावाचा आजार असेल, तर रात्री झोपेत स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही ओरडून झोपेतून जागे होऊ शकता!
तुम्हाला आठवत असेल: झटका येणे हे मेंदूतील अनियंत्रित विद्युत प्रवाहामुळे घडते. इतर बाबतींत अनियंत्रित विद्युत प्रवाह कारणीभूत नसतो.

पण, जेव्हा रुग्ण इस्पितळात डॉक्टरला भेटतो, तेव्हा डॉक्टर रुग्णाला अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विचारतो. जर रुग्णाला पुढील प्रकारचे झटके येत असतील ज्यामध्ये:
- पूर्व-संकेत होतो (जसे की, दुर्गंध, किंवा अतिशय घाबरणे, किंवा दृश्य-भास होणे, किंवा थरथरणे)
- १-२ मिनिटे रुग्ण काहीच प्रतिसाद देत नाही
- १-२ मिनिटे शरीर जोरजोरात थरथर कापते, पण डोळे उघडे राहतात
- झटका येऊन गेल्यावर, रुग्णाला बरे होण्यासाठी १५-४५ मिनिटे लागतात
असे होत असल्यास, हे झटके अप्सरमारचे असण्याची शक्यता जास्त असते, आणि इतर एखाद्या आजारामुळे असे घडण्याची शक्यता कमी असते.
कधीकधी तर डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाहीत, की रुग्णाला येणारे झटके अप्सरमारचे आहेत, की इतर कोणत्या आजाराचे. अशा वेळी, लाँग-टर्म-व्हिडिओ-ईईजी काढले पाहिजे.
एखाद्या व्यक्तीला अप्सरमार (अपस्मार) हा आजार आहे हे कसे ओळखायचे?
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत सांगतो.
असे समजू या की तुम्ही डॉक्टर आहात, आणि मी एक रुग्ण आहे.
समजा की मला वारंवार झटके येतात. तर तुम्ही म्हणाल की हे तर अगदी स्पष्ट आहे की माझ्या मेंदूला वारंवार झटके येण्याची प्रवृत्ती आहे. तुम्ही म्हणाल, की मला “अप्सरमार (अपस्मार)” हा आजार आहे. आणि तुम्ही मला पुन्हा झटके न येण्याची औषधे द्याल.
पण, समजा मला फक्त एकदाच, किंवा पहिल्यांदा झटका येतो. तर मग आता?
आता मी तुम्हाला म्हणणार, की डॉक्टर:
“आता मी काय पुढच्या झटक्याची वाट बघू? कोणतीतरी चाचणी असेलच तुमच्याजवळ, ज्यामुळे कळू शकेल की माझ्या मेंदूला पुन्हा झटका येण्याची प्रवृत्ती आहे की नाही???”
आणि माझे म्हणणे अगदी योग्यच आहे. अशा प्रकारचे टेस्ट/चाचण्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. यांमध्ये दोन मुख्य चाचण्या आहेत, एक आहे एम-आर-आय (MRI) आणि दुसरी आहे ई-ई-जी (EEG).
ज्यांना झटके येतात अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत या चाचण्या केल्या जातात.
- जर तुम्हाला अप्सरमार (अपस्मार) हा आजार असेल, तर या चाचण्यांमुळे आजाराचे कारण शोधण्यास मदत होऊ शकते.
- जर तुम्हाला अप्सरमारचा झटका एकदाच आला असेल, तर तुम्हाला पुन्हा झटका येण्याची शक्यता आहे की नाही हे या चाचण्यांमुळे कळू शकते.
पण, या चाचण्यांबद्दल चर्चा करण्याच्या आधी, Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) पूर्णपणे समजण्यासाठी अप्सरमारचे (अपस्मार) प्रकार समजून घेऊ या.
अप्सरमारचे प्रकार (Types of Epilepsy meaning in Marathi)
चला तर मग Types of Epilepsy meaning in Marathi – अप्सरमारचे प्रकार, मराठीमध्ये – जाणून घेऊ या.
अप्सरमारचे प्रकार समजण्यासाठी, तुम्हाला आधी Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) हा लेख वाचावा लागेल.
रुग्णाला ज्या प्रकारचे झटके (सीझर) येतात, त्या प्रकारच्या अप्सरमारचे नाव त्या आजाराला दिले जाते. उदाहरणार्थ:
झटक्याचे नाव | अप्सरमारचा प्रकार |
---|---|
एब्सेंट झटका | एब्सेंट एपिलेप्सी |
मायो-क्लोनिक झटका | मायो-क्लोनिक एपिलेप्सी. जर रुग्णामध्ये या आजाराची सुरुवात किशोरावस्थेत (१०-१८ वर्ष) झाली तर याला “ज्युवेनाईल मायो-क्लोनिक एपिलेप्सी” (JME) म्हटले जाते. |
गेलास्टिक झटका | गेलास्टिक एपिलेप्सी |
हा पहा एब्सेंट झटका (एब्सेंट एपिलेप्सी मध्ये होणाऱ्या झटक्याचे) उद्धरण:
कधीकधी अप्सरमारचे नाव, मेंदूच्या ज्या भागातून झटके येतात त्यावर अवलंबून असते.
मेंदूचे चार मुख्य भाग आहेत –
- डोळ्यांच्या वर “फ्रंटल लोब”
- कानांच्या खाली “टेंपोरल लोब”
- आणि मागच्या बाजूस “परायटल लोब” आणि “ऑक्सिपिटल लोब”
झटक्याचे नाव | अप्सरमारचा प्रकार |
---|---|
डेजा-वू झटका / जामे-वू झटका | अशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब” मधून होणारी एपिलेप्सी, म्हणजे “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. |
हायपर-कायनेटिक झटका | अशा प्रकारचे झटके सहसा “फ्रंटल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. कधीकधी “टेंपोरल लोब एपिलेप्सी” किंवा “परायटल लोब एपिलेप्सी” मध्येही होऊ शकतात. |
गेलास्टिक झटका | अशा प्रकारचे झटके सहसा “टेंपोरल लोब एपिलेप्सी” मध्ये होतात. |
इत्यादी…
आणि शेवटी, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येऊ शकतात. काही लोकांमध्ये अप्सरमारचे नाव इतर गोष्टींवर – जसे की, मेंदूची विचार करण्याची क्षमता, आनुवंशिकता, इत्यादींवर अवलंबून असते.
उदाहरणार्थ:
अप्सरमारचे प्रकार | अर्थ |
---|---|
स्टुर्ग – वेबर सिंड्रोम | यामध्ये लहान मुलांना झटका येण्यासोबतच चेहऱ्यावर तांबडे डागही पाहायला मिळतात. |
लेंनॉक्स-गस्टाउट सिंड्रोम | लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येतात (टोनिक, अ-टॉनिक, मायो-क्लोनिक, ड्रॉप-अटॅक, इत्यादी) आणि यांना नियंत्रणात ठेवणे कठीण असते. |
लँडो-क्लेफनर सिंड्रोम | यामध्ये लहान मुलांमध्ये झटक्यासोबतच बोलण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. वेळीच अप्सरमारवर उपचार न केल्यास, मुले मूक होऊ शकतात! |
अप्सरमारचे अशा प्रकारे कितीतरी नावे आहेत, आणि दर ५ वर्षांनी अशी कितीतरी नवीन नावे पुढे येतात. जर तुम्हाला या नावांबद्दल तपशीलवार अभ्यास करायचा असेल, तर येथे क्लिक करा: [वेगळ्या वेबसाईटवर तपशीलवार लिहिलेला लेख, इंग्रजीमध्ये]
अप्सरमारची तपासणी (Investigation of Epilepsy meaning in Marathi)
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) चा खरा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी याच्या तपासणीबद्दलही आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
एखाद्या व्यक्तीला जर झटका आला असेल, तर कमीतकमी दोन चाचण्या करणे गरजेचे आहे:
एम-आर-आय एक मशीन आहे, ज्याद्वारे मेंदूचे सूक्ष्म फोटो काढले जातात.
ही पाहा एम-आर-आय मशीन:
एम-आर-आय द्वारे मेंदूतील सूक्ष्म गोष्टी दिसतात. एम-आर-आय द्वारे मेंदूच्या रचनेतील विकृती, लहानपणी मेंदूला झालेली इजा, मेंदूतील गाठ, इत्यादी सर्व गोष्टी दिसतात.
अशा गोष्टींची उदाहरणे पाहा.
तीन गोष्टी समजण्यासारखी आहेत:
१. एम-आर-आय सर्वत्र उपलब्ध नसते. म्हणून काही डॉक्टर मेंदूची चित्रे काढण्यासाठी सी-टी सकॅनचा उपयोग करतात. पण सी-टी स्कॅनची चित्रे एम-आर-आय प्रमाणे सूक्ष्म नसतात. म्हणून, माझ्या मते अप्सरमारचा/झटके येण्याचा आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एम-आर-आय काढला पाहिजे.
२. “३ टेस्ला” नावाचा एम-आर-आय साधारण एम-आर-आयच्या तुलनेत चांगली चित्रे काढतो.
३. एम-आर-आय देखील अतिशय सूक्ष्म गोष्टी पाहू शकत नाही. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराने ग्रस्त ५०% रुग्णांमध्ये एम-आर-आय अगदी नॉर्मल असल्याचे दिसते. एम-आर-आय नॉर्मल असणे ही खरोखर एक चांगली बातमी आहे. याचा अर्थ असा की तुमची समस्या इतकी छोटी आहे की ती एम-आर-आयवर देखील दिसून येत नाही!
ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.
ई-ई-जी च्या मशीन ने मेंदू मधल्या इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करता येतो.
जर एखाद्या भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर तो ई-ई-जी मध्ये दिसून येतो.
एका रुग्णाची ई-ई-जी काढली जात असल्याचे तुम्ही पाहू शकता.
यामध्ये देखील तीन गोष्टी समजून घेण्यासारखी आहेत:
१. ई-ई-जी द्वारे फक्त विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते. या मशीनमध्ये विद्युत निर्मिती होत नाही किंवा यामुळे मेंदूला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची भीती राहत नाही.
२. ई-ई-जी मेंदूतील अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाहाचे मोजमाप करू शकत नाही. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराने ग्रस्त ५०% रुग्णांमध्ये ई-ई-जी देखील अगदी नॉर्मल असल्याचे दिसते.
३. दीर्घ ई-ई-जी (उदाहरणार्थ ४ तासांचा ई-ई-जी) केल्यास अनियंत्रित विद्युत प्रवाहाचे मोजमाप करण्याची क्षमता वाढते.
४. ज्या दिवशी ई-ई-जी करायची आहे त्याच्या आधीच्या रात्री कमी झोपल्यास, अनियंत्रित विद्युत प्रवाहाचे मोजमाप करण्याची क्षमता वाढते. पण, ई-ई-जी करण्याच्या आधीच्या रात्री कमी झोपायला तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितले असेल, तरच असे करा.
सामान्यत: झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजारामध्ये यापेक्षा जास्त चाचण्या करण्याची गरज नसते.
काही लहान मुलांना रक्तातील रासायनिक द्रव्ये कमी-जास्त झाल्याने झटके येण्याचा आजार होऊ शकतो. अशा वेळी रक्ताची तपासणी करण्याची आवश्यकता असू शकते.
जर तुमचे निदान स्पष्ट नसेल किंवा औषधोपचार करूनही झटके नियंत्रणात येत नसतील, तर डॉक्टर तुम्हाला लाँग-टर्म-व्हिडिओ-ई-ई-जी करायला सांगू शकतात.
लाँग-टर्म-व्हिडिओ-ई-ई-जीसाठी रुग्णाला इस्पितळात भरती केले जाते. २ ते ७ दिवसपर्यंत रुग्णाच्या मेंदूतील विद्युत प्रवाहाचा अगदी सखोल अभ्यास केला जातो. झटके येण्याच्या/अप्सरमारच्या आजाराच्या निदानासाठी ही सर्वात चांगली तपासणी आहे. या तपासणीसाठी काही दिवस लागतात आणि पैसेही खर्च होतात, म्हणून सर्व रुग्णांच्या बाबतीत या तपासणीचा वापर केला जात नाही.
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) समजून घेण्याच्या बाबतीत तुम्ही आणखी एक पायरी पार केली आहे!
आता आपण उपचाराबद्दल जाणून घेऊ या.
अप्सरमारचा उपचार (Treatment of Epilepsy meaning in Marathi)
Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) आता तुम्हाला माहीत झालेला आहे, आणि याच्यासाठी कोणत्या चाचण्या/तपासण्या करायच्या असतात हेदेखील तुम्हाला समजले आहे.
आता आपण उपचाराकडे वळू या.
सर्वसधारणत:, अप्सरमारच्या झटक्यांचा उपचार औषधांद्वारे केला जातो.
अप्सरमारसाठी औषधे उपलब्ध आहेत. अप्सरमारच्या औषधांची एक मोठी यादी इंग्रजीमध्ये येथे दिलेली आहे: [येथे क्लिक करा].
यांच्यामध्ये, अप्सरमारची ही औषधे सर्वसामान्य आहेत:
औषधांची नावे | टिप्पणी |
---|---|
Phenobarbital फिनोबार्बिटाल – उदा. गार्डीनल, इत्यादी | जुनी औषधे. आजकाल यांचा उपयोग कमी केला जातो. |
Phenytoin फिनेटोइन – उदा. एपटोइन, इत्यादी | जुने औषध आणि याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण, हे खूप स्वस्त आहे आणि परिणामकारक आहे, त्यामुळे काही डॉक्टर्स आजही याचा उपयोग करतात. |
Carbamazepine, Oxcarbazepine कार्बमेजेपीन, ऑक्सकार्बजेपीन – उदा. टेग्रीटल, ऑक्सिटोल, इत्यादी | नवीन औषधे. काही रुग्णांमध्ये जास्त प्रभावी. |
Valproate वालप्रोएट – उदा. डिपाकोटे, वाल्परिन, इत्यादी | नवीन औषधे. काही रुग्णांमध्ये जास्त प्रभावी. |
लेवेटीरासिटाम, ब्रिवारासिटाम – उदा. लेविपिल, लेवेरा, ब्रेविपिल, ब्रीवीॲक्ट, इत्यादी | आधुनिक औषधे. खूपच कमी दुष्परिणाम, पण यांच्या वापराने काही रुग्णांमध्ये राग वाढू शकतो. |
तुम्हाला येणारे झटके, तुमच्या शरीराची जडणघडण, स्वभाव, आणि विचार करण्याची शक्ती या गोष्टींच्या आधारावर डॉक्टर यांच्यापैकी एक किंवा दोन औषधे देतो.
पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कोणत्या रुग्णावर कोणते औषध प्रभावी ठरेल हे जाणून घेण्यासाठी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही. ना भारतात, ना अमेरिकेत.
परिणामकारक औषधे खूप विचारपूर्वक, आणि अनुभवाच्या आधारावर निवडावे लागतात.
कदाचित, असे होऊ शकते की पहिल्या औषधाचा परिणामच जाणवणार नाही. मग, दुसऱ्यांदा डॉक्टरांनी आणखी विचारपूर्वक दुसरे औषध लिहून दिले, तरीही कदाचित होऊ शकते की त्याचाही परिणाम दिसून येणार नाही.
हा दोष अप्सरमारच्या आजाराचा आहे, डॉक्टरचा नाही. अशा प्रकारच्या अप्सरमारच्या आजाराला “रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी” म्हणतात. या प्रकारच्या रुग्णांमध्ये कोणत्याही औषधाने अप्सरमारचे झटके थांबत नाहीत.
अशा प्रकारच्या रुग्णांना अप्सरमारच्या शस्त्रक्रियेची गरज असते.
जर २-३ औषधांचा वापर करूनही अप्सरमारचे झटके थांबत नसतील, तर मग शस्त्रक्रियेबद्दल जरूर विचार केला पाहिजे.
जर औषधांनी अप्सरमारचे झटके थांबत नसतील, तर शस्त्रक्रियेबद्दल विचार केला पाहिजे.
मेंदूत जेथे अनियंत्रित विद्युत प्रवाह उत्पन्न होत असतो तेथील एका छ्योट्या भागाला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जाते. असे केल्याने अप्सरमारचे झटके थांबतात. मेंदूतील चांगले भाग योग्य रीतीने कार्य करू शकतात.
अप्सरमारची शस्त्रक्रिया लक्षपूर्वक, खूप विचार करून करावी लागते, जेणेकरून शस्त्रक्रिया केल्यानंतर अप्सरमारचे झटके खरोखर थांबतील.
वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर
तरीपण, काही लोकांमध्ये मेंदूतील एखाद्या भागाला काढून टाकणे शक्य नसते, किंवा काढून टाकल्यानंतरही अप्सरमारचे झटके येत असतात. अशा लोकांनी वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटरबद्दल (Vagus Nerve Stimulator in Marathi – VNS) विचार केला पाहिजे.
वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर एक लहानशी बॅटरी आहे, जी छातीच्या त्वचेखाली बसवली जाते. यातून निघणारी बारीक वायर मानेच्या त्वचेखालच्या बारीक नसापर्यंत (वेगस) जाते. या उपकरणाला लावण्याची प्रक्रिया अगदी छोटीशी असते.
बॅटरीतून निघणाऱ्या बारीक विद्युत प्रवाहामुळे मेंदू संतुलित राहतो, आणि अप्सरमारचे झटके कमी येतात. ५०% रुग्णांमध्ये झटक्यांचे प्रमाण ५०% टक्क्यांनी कमी होते, आणि जवळजवळ २०% लोकांमध्ये अप्सरमारचे झटके पूर्णपणे बंद होतात.
सारांश
१. Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) समजून घेण्याच्या आधी Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) हा लेख वाचणे आवश्यक आहे.
२. झटके येणे (सीझर) आणि अप्सरमार (अपस्मार)/एपिलेप्सी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
३. झटके येणे (सीझर) १-२ मिनिटे चालणाऱ्या घटनेला म्हणतात.
४. Epilepsy meaning in Marathi (अप्सरमारचा अर्थ) वारंवार झटके येण्याची मेंदूची प्रवृत्ती.
५. अप्सरमारचे वेगवेगळे प्रकार आहेत. याचे इतके प्रकार आहेत की या सर्वांबद्दल येथे सांगणे अशक्य आहे.
अप्सरमारची तपासणी:
१. एम-आर-आय द्वारे मेंदूची चित्रे काढली जातात. “३ टेस्ला” एम-आर-आय अतिशय चांगला असतो.
२. ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.
अप्सरमारचा उपचार:
१. अप्सरमारच्या (अपस्मार)/एपिलेप्सी उपचारासाठी कितीतरी औषधे उपलब्ध आहेत.
२. जर २-३ औषधे देऊनही फायदा होत नसेल, तर अप्सरमारच्या शस्त्रक्रियेबद्दल किंवा वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटरबद्दल (VNS) विचार केला पाहिजे.
३. अप्सरमारची शस्त्रक्रिया किंवा VNS बद्दल जगात कोणीही १००% हमी देऊ शकत नाही. पण, लक्षपूर्वक, मन लावून हे उपचार केल्यास, कितीतरी रुग्णांना बऱ्यापैकी फायदा होतो.
अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) आहे मेंदू मध्ये अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी चा झटका येणे, ज्याच्या मुले विचित्र लक्षण दिसून येतात.
आपल्या सर्वांना हे माहिती आहे कि अपस्मारच्या झटक्यात शरीर जोर-जोरात हळू शकता. पण तुम्हाला हे माहिती आहे का, कि अपस्मारच्या अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी मुळे अगदी कोणता हि लक्षण होऊ शकते??
अश्या बऱ्याच लक्षणांना डॉक्टरांनी नावे दिली आहेत. अशी १०० पेक्षा अधिक नावे आहेत!
मग हे सगळे सोपा करून कसे समझहयचे? अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) कसा समझावा?
ह्या साठी, पहिली हि गोष्ट समझ कि अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार असतात:
अपस्मारच्या दौऱ्याचे २ प्रकार |
---|
१ . फोकल अपस्मार – छोटा अप्स्माराचा दौरा जो मेंदूच्या एकाच भागात होतो |
२ . जनरलाइज़्ड अपस्मार- मोठा अप्स्माराचा दौरा जो पूर्ण मेंदू मध्ये इलेक्ट्रिसिटी अनियंत्रित झाल्या मुळे होतो. |
सहसा झटके येण्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. याचे कारण म्हणजे बहुतांश लोकांना अशा प्रकारच्या झटक्यांबद्दल माहिती नसते.
मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, म्हणून झटक्याचा (सीझर) अर्थ अपस्मारच्या झटक्याचा अर्थ (Seizure meaning in Marathi) मराठीत सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.
झटक्याचा अर्थ पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे:
- झटके (सीझर) का येतात?
- झटक्यांची लक्षणे कोणती आहेत?
- झटक्यांचे निदान कसे केले जाते?
- झटक्यांवर कोणते उपचार केले जातात?
जर वारंवार झटके येत असतील, आणि तुमच्या मेंदूला झटके येण्याची सवय झाली असेल, तर या आजाराला मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सी असे म्हटले जाते.
झटक्यांबद्दल (सीझर) वाचून झाल्यानंतर, परत येऊन येथे क्लिक करा: (Meaning of Epilepsy in Marathi – (मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सी या आजाराचा अर्थ)
आता आपण झटक्याचा (सीझर) अर्थ (Seizure meaning in Marathi) समजून घेऊ या!
मी डॉक्टर सिद्धार्थ खारकर, ठाण्यातील न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Thane). मी मुंबईत न्यूरोलॉजिस्ट (Neurologist in Mumbai) म्हणूनही काम करतो. मी भारतातील एपिलेप्सी स्पेशालिस्ट (Epilepsy specialist in India) आहे आणि मी भारतात एपिलेप्सी सर्जरी (Epilepsy surgery in India) प्रदान करतो.
चला, सुरुवात करू या:
चला, या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल वाचूया.
Table Of Contents
- आपल्या मेंदूचे नियंत्रित कार्य
- छोटे झटके का येतात (Focal Seizure meaning in Marathi)?
- मोठे झटके का येतात (Generalized Seizure meaning in Marathi)?
- झटक्यांच्या वेळी विद्युत प्रवाह अनियंत्रित का होतो?
- झटके येण्याची इतर लक्षणे
- मिरगीच्या झटक्यांना इंग्रजीमध्ये इतकी सारी नावे का आहेत?
- (Focal Seizures) छोट्या झटक्यांची लक्षणे आणि नावे
- (Generalized Seizures) मोठ्या झटक्यांची लक्षणे आणि नावे
- छोट्या आणि मोठ्या दोन्ही झटक्यांच्या वेळी दिसणारी लक्षणे:
- सारांश
आपल्या मेंदूचे नियंत्रित कार्य
आपल्या मेंदूचे कार्य विद्युत प्रवाहावर आणि रासायनिक द्रव्यांवर चालते.
मेंदूचे वेग-वेगळे भाग वेग-वेगळी कार्य करतात. हे भाग एक-मेकांशी इलेक्ट्रिसिटी द्वारे संकेत पाठवतात
जेव्हा आपल्या मेंदूचा एक भाग दुसऱ्या एखाद्या भागाला संदेश पाठवू इच्छितो, तेव्हा मेंदू त्या भागात एका छोटासा विद्युत प्रवाह पाठवतो.
अशा प्रकारचे करोडो छोटे-छोटे प्रवाह आपल्या मेंदूत सतत प्रवाहित होत असतात.
हे सगळे विद्युत प्रवात नियंत्रित असतात.
जेव्हा तुमची इच्छा असते, तेव्हाच तुमचा मेंदू हात हलवण्याचा संदेश पाठवतो. जेव्हा तुमची इच्छा असते, तेव्हाच तुमचा मेंदू तोंडातून आवाज काढण्याचा संदेश पाठवतो.
छोटे झटके का येतात (Focal Seizure meaning in Marathi)?
आता जरा विचार करा की मेंदूतील दोन लहान-लहान वायर्स एकमेकांना चिकटून बसतात. याला इंग्रजीमध्ये क्रॉस-कनेक्शन म्हणतात.
अशा वेळी काय होईल?
हो, तेथील विद्युत प्रवाह अनियंत्रित होईल. विद्युत प्रवाह विनाकारण फडफडत राहील.
जेव्हा अनियंत्रित इलेक्ट्रिसिटी फक्त एका भागात असते तेव्हा त्याला “छोटी फिट” किंवा “Focal seizure” म्हणतात.
जेव्हा हा अनियंत्रित विद्युत प्रवाह मेंदूतील एकाच भागापर्यंत मर्यादित असतो, तेव्हा सौम्य लक्षणे जाणवतात, जसे की:
- मेंदूतील ज्या भागामुळे आपल्या हाताची हालचाल होते, त्या भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर आपला हात आपोआप फडफडायला लागतो.
- जर मेंदूच्या सुगंधाशी संबंधित भागातील विद्युत प्रवाह अनियंत्रित असेल, तर आपल्याला विनाकारण खूप छान सुगंध येऊ लागतो किंवा खूप दुर्गंध जाणवू लागते.
इंग्रजीमध्ये याला “Focal Seizure” म्हणतात. मराठीत तुम्ही याला “छोटा झटका” म्हणू शकता.
मोठे झटके का येतात (Generalized Seizure meaning in Marathi)?
एखाद्या ढगाप्रमाणे, कधीकधी हा अनियंत्रित विद्युत प्रवाह १०-१५ सेकंदांमध्ये संपूर्ण मेंदूत पसरतो.
असे प्रत्येक वेळी घडत नाही. पण, जेव्हा असे घडते तेव्हा संपूर्ण शरीर जोरजोरात थरथरू लागते.
Generalized Seizure meaning in Marathi
माणसाची शुद्ध हरपते, काही वेळा तो जीभ चावून घेतो. त्याचे डोळे उघडे राहतात. बहुतेक वेळा मोठ्या झटक्याच्या वेळी मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण नसते.
मोठा झटका सहसा फक्त १-२ मिनिट इतक्या कालावधीचा असतो.
अशा प्रकारच्या मोठ्या झटक्यानंतर, माणसाला थकवा जाणवतो. त्याला पूर्णपणे बरे व्हायला २० पेक्षा जास्त मिनिटे लागू शकतात.
इंग्रजीमध्ये याला “Generalized Seizure” म्हणतात. मराठीमध्ये तुम्ही याला “मोठा झटका” म्हणू शकता.
झटक्यांच्या वेळी विद्युत प्रवाह अनियंत्रित का होतो?
आता आपण थोडेसे खोलात जाऊ या.
Seizure meaning in Marathi तुम्हाला याचा अर्थ लगेच कळावा म्हणून मी म्हटले होते की क्रॉस-कनेक्शनमुळे विद्युत प्रवाह अनियंत्रित होतो.
या क्रॉस-कनेक्शनचे नेमके कारण समजणे थोडेसे कठीण आहे. म्हणून त्याविषयी मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्हाला झटके येण्याच्या कारणांबद्दल आणखी जास्त जाणून घ्यायचे असेल, तर येथे क्लिक करा [डॉ. बालेस्ट्रिनी यांनी लिहिलेला लेख, इंग्रजीमध्ये].
कारण १. पेशींच्या नलिकांमध्ये बिघाड: मेंदूच्या पेशींमध्ये परमाणू आत-बाहेर जाण्यासाठी सूक्ष्म नलिका असतात. जर यांच्यापैकी एखाद्या नलिकेमध्ये बिघाड झाला, तर झटके येण्याचा आजार होऊ शकतो.
कारण २. गर्भातील बाळाचा अनियमित विकास: गर्भात असतानाच आपल्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला असतो. गर्भात असताना मेंदूच्या विकासात काही अडथळा निर्माण झाल्यास, झटके येण्याचा आजार उद्भवू शकतो.
झटके येण्याची इतर लक्षणे
झटक्यांची अनेक लक्षणे असू शकतात.
पण, मेंदूच्या काही मोजक्या भागांमध्ये वारंवार झटके येतात. म्हणून या भागांमध्ये होणारी लक्षणे आपल्याला बहुतेक वेळा पाहायला मिळतात.
बहुतेक वेळा पाहायला मिळणाऱ्या झटक्यांची लक्षणे |
1. दुर्गंध किंवा खूप जास्त सुगंध जाणवणे 2. वाईट चव – काही लोकांना तोंडात रक्ताची किंवा धातूची चव जाणवते 3. अचानक अतिशय घाबरणे किंवा व्याकूळ होणे 4. स्मृतीशी संबंधित विकार – रुग्णाला वाटते की असे तर माझ्यासोबत घडले आहे! 5. अचानक दृश्य-भास (वाईट स्वप्न) होणे 6. शरीराच्या अवयवांमध्ये/हात किंवा पायांमध्ये मुंग्या येणे 7. शरीराचे अवयव/हात किंवा पाय थरथरणे 8. स्वतःमध्ये मग्न असणे, प्रतिसाद न देणे |
पण, मी म्हटल्याप्रमाणे, झटके येण्याची कोणतीही लक्षणे असू शकतात. आता ही आहेत झटके येण्याची असामान्य लक्षणे:
झटके येण्याची असामान्य लक्षणे |
1. विनाकारण अचानक राग व्यक्त करणे 2. विनाकारण अचानक अत्यंत आनंदी होणे किंवा अत्यंत दुःखी होणे 3. शरीराच्या बाहेर तरंगत असल्याचा भास होणे 4. अचानक मळमळ/उलटीचा भास होणे 5. अचानक मूत्र विसर्जन करण्याची इच्छा होणे 6. चक्कर येणे 7. विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा भास होणे 8. जलद गतीने डोळे फडफडणे |
विनाकारण हसणे किंवा विनाकारण रडणे पण फिट (सीझर) चे लक्षण असू शकते.
मिरगीच्या झटक्यांना इंग्रजीमध्ये इतकी सारी नावे का आहेत?
आता तुम्हाला Seizure meaning in Marathi (झटक्याचा (सीझर) अर्थ) माहीत झालेला आहे. सोप्या शब्दांमध्ये लक्षणांचे वर्णन केल्यामुळे अर्थ एकदम स्पष्ट होतो.
पण, डॉक्टर लोक इतक्या सरळ-सोप्या नावांनी कधीच समाधानी होत नसतात!!!
यातील विनोदाचा भाग सोडला, तर सहसा इंग्रजीच्या कठीण शब्दांची गरज भासत नाही. पण, झटक्यांची लक्षणे समजावून सांगायला या शब्दांमुळे मला खूप मदत होते.
नावांपेक्षा झटक्यांच्या लक्षणांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण, तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणामध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास, ती लक्षणे ओळखणे तुम्हाला शक्य होईल.
झटक्यांच्या (सीझर) वेळी जी लक्षणे दिसतात, त्यांच्या आधावरावर छोट्या झटक्यांना अनेक वैज्ञानिक नावे देण्यात आली आहेत:
(Focal Seizures) छोट्या झटक्यांची लक्षणे आणि नावे
आपण पाहिल्याप्रमाणे, छोटे झटके मेंदूच्या एकाच भागात होतात. यांच्यामुळे होणारी लक्षणे छोटी असतात.
Focal Seizure meaning in Marathi माहिती करून घेण्यासाठी या छोट्या लक्षणांबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे.
या छोट्या झटक्यांची इंग्रजी नावे आहेत ऑटोमॅटिझम, डेजा-वू, इत्यादी. यांच्याबद्दल तपशीलवारपणे वाचण्यासाठी खाली दिलेल्या क्रॉस चिन्हावर क्लिक करा.
छोट्या झटक्यांची लक्षणे आणि त्यांची इंग्रजी नावे
छोट्या झटक्यांची नावे | छोट्या झटक्याची लक्षणे |
ऑटोमॅटिझम | रुग्ण नकळतपणे पुन्हा-पुन्हा त्याच त्या हालचाली करू लागतो – जसे की हात चोळणे, जीभ आत-बाहेर करणे, मिटक्या मारणे (lip smacking seizure), इत्यादी. |
डिसोसीएटिव्ह सीझर | रुग्ण स्वतःमध्येच मग्न असतो. प्रतिसाद देत नाही. |
डेजा-वू सीझर | रुग्णाला विचित्र भास होतात. त्याला वाटते की, “अरे! असे तर माझ्यासोबत याआधी देखील घडले आहे.” |
जामे-वू सीझर | रुग्णाला विचित्र भास होतो. त्याला आधीही झटके येऊन गेलेले असतात, तरीपण त्याला वाटते की, “अरे! हे तर, काहीतरी नवीनच आहे.” |
हायपर-कायनेटिक सीझर | रुग्ण अतिशय उत्तेजित होतो!!! तो एखाद्या माशाप्रमाणे तडफडू लागतो, किंवा जेलमधील कैद्याप्रमाणे मोठ्याने किंचाळतो, अतिशय जोरजोरात हात-पाय आपटतो! |
डॅक्रिस्टिक सीझर | रुग्ण विनाकारण रडू लागतो. |
गेलास्टिक सीझर | रुग्ण विनाकारण हसू लागतो. |
अशा प्रकारच्या असामान्य झटक्यांची लक्षणे पाहून चेष्टा करणे किती सोपे आहे! बिचाऱ्या रुग्णाची विनाकारण चेष्टा करणे खरोखर किती सोपे आहे!
असे करू नका. झटक्यांची लक्षणे ओळखा. त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करा.
(Generalized Seizures) मोठ्या झटक्यांची लक्षणे आणि नावे
आपण माहिती करून घेतल्याप्रमाणे, मेंदूत सगळीकडे विद्युत प्रवाहाचे वादळ पसरल्यामुळे मोठे झटके उद्भवतात.
अपेक्षेप्रमाणे, मोठ्या झटक्यांची लक्षणेदेखील मोठी असतात.
परत एकदा, नावांपेक्षा लक्षणांकडे पाहा. ही लक्षणे समजणे Generalized Seizure meaning in Marathi समजण्यासाठी आवश्यक आहे.
या मोठ्या झटक्यांची इंग्रजी नावे आहेत अब्सेंट सीझर, मॅलोनिक सीझर, इत्यादी. यांच्याबद्दल तपशीलवारपणे वाचण्यासाठी क्रॉस चिन्हावर क्लिक करा:
मोठ्या झटक्याची लक्षणे आणि इंग्रजी नावे.
मोठ्या झटक्यांची नावे | मोठ्या झटक्याची लक्षणे |
अब्सेंट (पेटिट-माल) सीझर | रुग्ण/मूल प्रतिसाद देत नाही. त्याचे डोळे उघडे राहतात, पण तो स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असल्यासारखा वाटतो. |
मायो-क्लोनिक सीझर | जणू काही विजेचा झटका लागल्याप्रमाणे, अचानकपणे एकदाच संपूर्ण शरीर थरथरते. |
स्पाझम | संपूर्ण शरीर काही सेकंदांसाठी ताठर होते. |
हे पहा अब्सेंट (पेटिट-माल) सीझर चे एक उद्धरण (डॉ राजीव गुप्ता – Youtube द्वारे):
आणि हे लहान मुलाला पुन्हा-पुन्हा स्पाझम चा झटका येतोय:
छोट्या आणि मोठ्या दोन्ही झटक्यांच्या वेळी दिसणारी लक्षणे:
काही लक्षणे दोन्ही प्रकारच्या झटक्यांच्या वेळी दिसू शकतात – जसे की हात-पाय ताठर होणे किंवा जोरजोरात थरथर कापणे.
जेव्हा अनियंत्रित विद्युत प्रवाह एकाच भागापुरता मर्यादित असतो (छोटा झटका), तेव्हा शरीराचा फक्त एकच भाग थरथर कापतो.
जेव्हा हा अनियंत्रित विद्युत प्रवाह संपूर्ण मेंदूत पसरतो (मोठा झटका) तेव्हा हीच लक्षणे संपूर्ण शरीरात पाहायला मिळतात.
अशा प्रकारच्या झटक्यांची नावे आहेत टोनिक सीझर, क्लोनिक सीझर, इत्यादी. यांच्याबद्दलच्या तपशीलवार माहितीसाठी क्रॉस चिन्हावर क्लिक करा:
छोट्या आणि मोठ्या झटक्यांची लक्षणे आणि त्यांची इंग्रजी नावे
छोट्या आणि मोठ्या झटक्यांची नावे | लक्षणे |
टॉनिक सीझर | शरीराचा एक भाग किंवा संपूर्ण शरीर कडक होते. हे काहीसे स्पाझमप्रमाणेच असते. |
क्लोनिक सीझर | शरीराचा एक भाग किंवा संपूर्ण शरीर जोरजोरात थरथरू लागते. |
टॉनिक-क्लोनिक सीझर | शरीर थोड्या वेळासाठी कडक होते, मग १०-१५ सेंकंदानंतर जोराजोरात थरथरू लागते. |
ए-टॉनिक सीझर | अचानकपणे शरीराच्या एका भागाची किंवा संपूर्ण शरीराची ताकत नाहीशी होते. |
ड्रॉप-अटॅक | रुग्ण/मूल अचानकपणे खाली कोसळतो. |
हे पहा ए-टॉनिक सीझर चे एक उद्धरण, Youtube वर एका आईने पोस्ट केले आहे:
आता तर तुम्ही Seizure meaning in Marathi मध्ये अगदी तरबेज झाला आहात!
आता, झटक्यांच्या तपासणीबद्दल पाहू या.
सारांश
१. Seizure meaning in Marathi म्हणजे झटके (सीझर).
२. आपल्या मेंदूतील वेगवेगळे भाग नियंत्रित विद्युत प्रवाहाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात.
३. अनियंत्रित विद्युत प्रवाहामुळे झटके उद्भवतात.
४. जेव्हा मेंदूतील छोट्याशा भागात विद्युत प्रवाह अनियंत्रित असतो, तेव्हा त्याला छोटा झटका (फोकल सीझर – Focal Seizure) म्हटले जाते.
५. जेव्हा अनियंत्रित विद्युत प्रवाह संपूर्ण मेंदूत पसरतो, तेव्हा त्याला मोठा झटका (जनरलाईज्ड सीझर – Generalized Seizure) म्हटले जाते.
६. छोट्या आणि मोठ्या झटक्यांच्या लक्षणांबद्दल वर तपशीलवारपणे सांगितलेले आहे.
जसे की तुम्ही नंतर, Epilepsy meaning in Marathi (मिरगी (अपस्मार)/एपीलेप्सीचा अर्थ) या लेखात वाचन करू शकाल:
१. एम-आर-आय द्वारे मेंदूची फोटो काढली जातात. “३ टेस्ला” एम-आर-आय अतिशय चांगला असतो.
२. ई-ई-जी द्वारे मेंदूतील विद्युत प्रवाहाचे मोजमाप केले जाते.
३. झटके/मिरगीच्या (अपस्मार) उपचारासाठी कितीतरी औषधे उपलब्ध आहेत.
४. जर २-३ औषधांचा वापर करूनही फायदा होत नसेल, तर झटक्यांवरील शस्त्रक्रिया किंवा वेगस-नर्व्ह-स्टिम्युलेटर (VNS) यांच्याबद्दल विचार केला पाहिजे.
५. झटक्यांवरील शस्त्रक्रिया किंवा VNS बद्दल जगात कोणीही १००% हमी देऊ शकत नाही. पण, लक्षपूर्वक, मन लावून हे उपचार केल्यास, कितीतरी रुग्णांना बऱ्यापैकी फायदा होतो.